भारत-चीन सीमावाद: शिवसेनेची मोदी सरकारकडं 'ही' मागणी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 8, 2020

भारत-चीन सीमावाद: शिवसेनेची मोदी सरकारकडं 'ही' मागणी

https://ift.tt/2Ybtsaj
मुंबई: 'चीन हा रोज इंच इंच भारताच्या हद्दीत सरकतो आहे. त्यामुळं चीनला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. प्रत्येक वेळी चीनचे खापर नेहरुंवर फोडून उपयोग नाही. १९६२ सालचा भारत आज राहिलेला नाही. आमच्या सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे, मेणबत्त्या नसून बंदुका आहेत हे दाखवून द्या,' असं आवाहन शिवसेनेनं केंद्रातील सरकारला केलं आहे. ( on Tussle) भारत आणि चीनमधील लडाखच्या सीमेवर सध्या तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर उभे ठाकले आहेत. चीनच्या सैन्यानं भारताच्या ६० चौरस मैल भूभागावर घुसखोरी केल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून याबाबत चिंता व्यक्त करताना मोदी सरकारला ठोस कृती करण्याचं आवाहन केलं आहे. वाचा: '१९६२ साली पराभवाचे खापर आजही पंडित नेहरू व गांधी कुटुंबावर फोडणे हीच आपली चीनविरुद्ध युद्ध सज्जता आजही आहे. यांनी चीनविषयी एखादा प्रश्न विचारला की, चीनची समस्या नेहरूंमुळेच निर्माण झाल्याचे सांगितले जाते. वरुण गांधी हे भाजपचे नेते आहेत. पंडित नेहरू त्यांचेही पणजोबा आहेत हे विसरता येत नाही. १९६२ साली चीनने भारताला फसवले तसे २०१८ लाही फसवले. चीनचे राष्ट्रपती मोदींच्या गावात झोपाळा हलवून गेले, पण त्यानंतर चिनी सैन्याने आमच्या हद्दीत अनेकदा घुसखोरी केली. आधी डोकलाम व आता लडाखमध्ये युद्धाची स्थिती निर्माण केली. ही फसवणूकच आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'एका बाजूला ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’चे ढोल पिटायचे व दुसर्‍या बाजूला चीनची बाजारपेठ खुली ठेवायची. यातून चीनला आर्थिक बळ मिळते. करोनामुळे भारताची अर्थव्यवस्था संपली आहे. बेरोजगारी वाढली आहे आणि भारत सरकार चीनसाठी बाजारपेठ खुली करून त्यांच्या राक्षशी महत्त्वाकांक्षेला आणि साम्राज्यवादालाच ताकद देत आहे. चिनी वस्तूंच्या वापरावर बंदी घालणे गरजेचे आहे व सरकारला आता त्यावर निर्णय घ्यावाच लागेल,' अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केलीय. वाचा: 'आपण पाकिस्तानला रोज लाथा घालतो कारण हा सरळ हिंदू-मुसलमान झगडा ठरतो व त्यात राजकीय फायद्या-तोट्याचे गणित असते, पण चीन आपला देश रोज इंच इंच कुरतडत आहे. त्याचे आमच्या राज्यकर्त्यांना काहीच वाटत नाही. पाकिस्तानशी लढण्यासाठी ५६ इंचाची छाती हवी, असे आम्हाला वाटत नाही. पाकिस्तान हा चीनचा गुलाम आहे. मात्र चीनशी लढण्यासाठी ५६ इंचाची छाती हवी व ती पंतप्रधान मोदी यांच्यापाशी आहे,' असा टोलाही शेवटी लगावण्यात आलाय.