अभिनेता मुरली शर्माच्या आईचं ७६ व्या वर्षी निधन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 9, 2020

अभिनेता मुरली शर्माच्या आईचं ७६ व्या वर्षी निधन

https://ift.tt/2BNtRs9
मुंबई- बॉलिवूड अभिनेता यांची आई यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्यावर्षी मुरली यांचे वडील व्रिजभूषण शर्मा यांचं ८४ व्या वर्षी निधन झालं होतं. अभिनेत्री अश्विनी कासेकरशी मुरली यांनी लग्न केलं आहे. बॉलिवूडमधील दिग्गजांसोबत केलं काम- मुरली यांनी त्यांच्या कारकिर्दीत जास्त करून पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. त्यांनी शाहरुख खानच्या 'मैं हूं ना', सलमान खानच्या 'दबंग' आणि प्रभासच्या 'साहो' सिनेमात काम केलं आहे. नुकतेच चे वरुण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर 'स्ट्रीट डान्सर ३डी' मध्ये दिसले होते. तेलगू आणि तमिळ सिनेमांत केलं काम- याशिवाय मुरली यांनी अनेक तेलगू आणि तमिळ सिनेमांमध्येही काम केलं आहे. Ala Vaikunthapurramuloo या तेलगू सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं होतं. तसंच महेश बाबू आणि रश्मिका मंदाना यांच्या Sarileru Neekevvaru सिनेमातही त्यांनी काम केलं होतं.