'हरिओम'ऐवजी 'हे राम' म्हणावे लागेल, अशी वेळ लोकांनी आणू नये! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 2, 2020

'हरिओम'ऐवजी 'हे राम' म्हणावे लागेल, अशी वेळ लोकांनी आणू नये!

https://ift.tt/2Xpwmt5
मुंबई: 'मुख्यमंत्री यांनी ‘पुन:श्च हरिओम’चा नारा देऊन जनजीवनात प्राणवायू फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. आता जनतेने बेभान आणि बेबंद होऊन जगू नये. ‘हरिओम’ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये', असा प्रबोधनाचा डोस आज शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या शब्दाला केराची टोपली दाखवत राज्याला पूर्वपदावर आणण्याचा संकल्प केला आहे. ' मिशन बिगिन अगेन ' अंतर्गत राज्यात अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. त्याचा उल्लेख करत 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून नागरिकांना खास आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांनी आता संयम व स्वयंशिस्त दाखवावी, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. 'महाराष्ट्राची ११ कोटी जनता टाळेबंदीच्या तुरुंगातून या पुढे तीन टप्प्यांत मुक्त होणार आहे. जनतेने दोनेक महिने कडक तुरुंगवास भोगला आहे. या दोन महिन्यांत जीवनाची दिशा पूर्णपणे बदलली आहे. यापुढे अनेकांच्या बेबंद, बेशिस्त वागण्यावर बंधने येतील. शिस्त मोडणे नुसते महाग पडणार नाही, तर जीवावर बेतू शकेल', असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. ‘पुन:श्च हरिओम’ करताना या धोक्याची जाणीव प्रत्येक पावलावर ठेवावी लागेल. अमेरिकी सरकारने अर्थचक्र गतिमान करण्यासाठी निर्बंध मागे घेतले होते. त्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले व त्यांचे ‘पुन:श्च हरिओम’ धोकादायक ठरले. म्हणून सरकारी दिलदारीचा गैरवापर कोणी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. यांनी ब्रिटिशांचा बंदीवास व देश गुलामीच्या बेड्यांत असताना ‘पुन:श्च हरिओम’चा नारा दिला होता. आता ठाकरे सरकारने देश स्वतंत्र असताना आणि जनता टाळेबंदीच्या बेड्यांत जखडलेली असताना तोच ‘पुन:श्च हरिओम’चा नारा देऊन जनजीवनात प्राणवायू फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. तूर्त तरी या ‘पुन:श्च हरिओम’चे स्वागत करायला हवे, असे अग्रलेखात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी दाखवला '' सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे यांची मागणी नाकारत राज्यपालांना ' ठाकरी बाणा ' दाखवल्याचे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.