औरंगाबादमध्ये करोनामुळे ८५ जणांनी गमावला जीव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 3, 2020

औरंगाबादमध्ये करोनामुळे ८५ जणांनी गमावला जीव

https://ift.tt/2XtLCVy
औरंगाबाद: शहर परिसरात व जिल्ह्यामध्ये नव्याने ४७ बाधित व्यक्ती आढळून आल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांची एकूण संख्या १६९६ झाली आहे. तसेच शहरातील ७४ वर्षीय करोना बाधिताचा बुधवारी (३ जून) सकाळी साडेसहा वाजता मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांच्या मृत्यूची संख्या ८५ झाली आहे. दरम्यान, १०८५ बरे होऊन घरी गेले असून, सध्या ५२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये जसवंतपुरा येथील १, संजय नगर, मुकुंदवाडी १, खोकडपुरा २, अजिंक्य नगर १, समता नगर २, समृद्धी नगर, एन-४ १, जय भवानी नगर १, लेबर कॉलनी २, मिल कॉर्नर ४, हमालवाडी, रेल्वे स्टेशन १, भावसिंपुरा २, शिवशंकर कॉलनी ५, पिसादेवी रोड १, कटकट गेट १, सिल्लेखाना, नूतन कॉलनी १, बारी कॉलनी १, उल्कानगरी १, एन-सहा, संभाजी कॉलनी, सिडको १, शरीफ कॉलनी १, कैलास नगर ४, स्वप्न नगरी, गारखेडा परिसर १, भवानी नगर, जुना मोंढा १, पुंडलिक नगर रोड, गारखेडा १, विद्यानिकेतन कॉलनी १, सुराणा नगर २, अन्य ३ आणि यशवंत नगर, पैठण ३, अब्दुलशहा नगर, सिल्लोड १ अशा रहिवाशांचा समावेश आहे. यामध्ये २१ महिला आणि २६ पुरुष रुग्ण आहेत. खासगी रुग्णालयात सकाळी मृत्यू शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये एन-चार सिडको परिसरातील ७४ वर्षीय करोना बाधित पुरूष रुग्णाचा बुधवारी (३ जून) सकाळी साडेसहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ६८, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १६, तर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एका करोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ८५ करोना बाधितांनी उपचारादरम्यान जीव गमावल्याचे स्पष्ट झाले आहे.