
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज आणि त्याची पत्नी यांच्यात गेल्या काही काळापासून मतभेद सुरू आहेत. हसीनाने सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी हसीनाने सोशल मीडियावर एक न्यूड फोटो शेअर करत सर्वांना धक्का दिला होता. यावर आता प्रथम शमीने उत्तर दिले आहे. वाचा- हसीनाने न्यूड फोटो शेअर केला तेव्हा त्यातील व्यक्ती शमी असल्याचे सांगितले होते. तसेच तिने एक मेसेज लिहला होता. या मेसेजमध्ये तिने शमीवर आरोप करण्याची संधी सोडली नव्हती. शमीने सोमवारी करोना लॉकडाऊनमुळे घरी जाणाऱ्या गरजूंना मदत करत असल्याचा फोटो शेअर केला. स्वत: शमी प्रवासी मजूरांना जेवण आणि फळ देत होता. याचवेळी शमीने पत्नी हसीनाने केलेल्या आरोपांना उत्तर दिले. तिने केलेले सर्व आरोप निराधार आणि चुकीचे आहेत. हसीनाने हे आरोप सिद्ध करून दाखवावेत. माझा आता हसीनासोबत काहीही संबंध नाही. हसीनाने शमीवर गंभीर आरोप लावले होते. त्याचे अन्य महिलेसोबत संबंध असल्यासह घरगुती हिंसाचाराचा आरोप शमीवर करण्यात आला होता. या दोघांतील वाद आता कोर्टात आहे. न्यूड फोटो शेअर करताना काय म्हणाली होती हसीना कल तू कुछ नहीं था तो मैं पाक थी, आज तू कुछ बन गया तो मैं नापाक हो गई। झूठ बुर्खा डालकर बेपर्दा सच को मिटा नहीं सकता। मगरमच्छ के आंसू कुछ दिनों का ही सहारा होते हैं.