Jitendra Awhad: तू कार वापरत नाहीस का; अक्षय कुमारला आव्हाडांचा सवाल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 25, 2020

Jitendra Awhad: तू कार वापरत नाहीस का; अक्षय कुमारला आव्हाडांचा सवाल

https://ift.tt/3g0hgQX
ठाणे: पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून मोदी सरकारवर सातत्यानं टीका करणारे राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी आता मोदी समर्थकांकडे मोर्चा वळवला आहे. इंधनाच्या महागाईच्या मुद्द्यावरून आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिनेता अक्षय कुमारला उपरोधिक शब्दांत टोले लगावले आहेत. (Jitendra Awhad questions ) वाचा: गेल्या काही दिवसांतील महसुली तोटा भरून काढण्यासाठी तेल कंपन्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळं पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. सलग १९व्या दिवशी दरवाढीचा हा धडाका सुरू आहे. आज पेट्रोल आणि डिझेलचे दर १४ ते १५ पैशांनी वाढले आहेत. १९ दिवसांत पेट्रोल ८.६६ रुपये तर डिझेल १०.३९ रुपयांनी महागले आहे. दिल्लीत डिझेलच्या दराने ८० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. याच मुद्द्यावरून आव्हाड यांनी आज पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. आव्हाड यांनी आजच्या ट्विटमधून अक्षयकुमारला लक्ष्य केलं आहे. २०११ साली यांचं सरकार असताना इंधनांच्या वाढत्या दरांवरून अक्षय कुमारनं एक ट्विट केलं होतं. 'पेट्रोल पुन्हा महागण्याआधी मुंबईकरांनी पेट्रोल पंपांवर लांबलचक रांगा लावल्या आहेत. त्यात अडकल्यानं मला रात्री घरी देखील जाता आलं नाही,' असं अक्षयनं त्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. आव्हाड यांनी याच ट्विटला टॅग करून अक्षयला खोचक प्रश्न केले आहेत. 'अक्षय, तू ट्विटरवर सक्रिय नाहीस का?... तू कार वापरणं बंद केलंस का?... तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का?... तुझ्या माहितीसाठी सांगतो की देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत,' असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अक्षय कुमारनं सध्याच्या महागाईवरही व्यक्त व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी या माध्यमातून व्यक्त केली आहे. इंधनाच्या महागाईच्या मुद्द्यावरून याआधीही आव्हाड यांनी दोनदा ट्विट केली आहेत. 'देशातील जनता सध्या करोना व्हायरसचा सामना करण्यात गुंतली आहे. शिवाय, भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाकडेही लोकांचं लक्ष आहे. या साऱ्यातून इंधनाच्या दरवाढीकडे त्यांचं लक्ष जाणार नाही हे केंद्र सरकारला चांगलं माहीत आहे,' असा टोला त्यांनी एका ट्विटमधून हाणला होता. तर, बुधवारी केलेल्या एका ट्विटमध्ये त्यांनी २०१४ च्या निवडणूक प्रचाराच्या वेळचं पोस्टर शेअर केलं होतं. विसरला असाल तर लक्षात आणून देतो, असं त्यांनी त्यात म्हटलं होतं. दरवाढ सुरूच राहणार? करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात इंधनाच्या किमतींचा दैनंदिन आढावा तात्पुरता बंद होता. मात्र लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर ७ जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी नियमित दर निश्चिती पुन्हा सुरू केली. लॉकडाउनमुळे इंधन विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. १६ मार्च ते ५ मे दरम्यान देशातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर होता. कच्च्या तेलाच्या किंमती मात्र या काळात वाढत होत्या. हा तोटा भरून काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता दरवाढीचा सपाटा लावला आहे. मागील दोन महिन्यांतील नुकसान भरून काढण्यासाठी आणखी काही दिवस पेट्रोल आणि डिझेल महागण्याची शक्यता आहे.