मुख्यमंत्र्यांच्या कलानगरात करोनाचा शिरकाव; 'मातोश्री'च्या बाजूच्या बंगल्यातच सापडला रुग्ण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 25, 2020

मुख्यमंत्र्यांच्या कलानगरात करोनाचा शिरकाव; 'मातोश्री'च्या बाजूच्या बंगल्यातच सापडला रुग्ण

https://ift.tt/2BCWTe1
मुंबई: मुख्यमंत्री यांचे खासगी निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील कलानगर येथेही करोनाचा शिरकाव झाला आहे. कलानगरातील मातोश्री बंगल्याच्या बाजूलाच असलेल्या बंगल्यात एक करोना रुग्ण सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून हा बंगलाच सील करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर एप्रिल महिन्यात मातोश्रीच्या आवारातील एका चहावाल्यालाही करोना झाला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून मातोश्री परिसरात हा चहावाला चहा विक्री करतो. या चहावाल्याला करोनाची लागण झाल्याचं आढळून आल्यानंतर मातोश्रीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या १७० पोलीस आणि एसआरपीएफ जवानांना खबरदाराची उपाय म्हणून क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर आता मातोश्रीला लागून असलेल्या बंगल्यातच करोनाबाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणेची पुन्हा एकदा झोप उडाली आहे. दरम्यान, राज्यात रुग्ण बरे होण्याचा आलेख वाढत असून सुमारे १५ दिवसांआधी ५ हजार ७१ एवढे रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे. आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा करोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर कायम आहे. दिलासादायक बाब म्हणजे करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई मंडळात आत्तापर्यंत ५० हजार रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात काल सोडण्यात आलेल्या ४ हजार १६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ३५३० (आतापर्यंत एकूण ५१ हजार ७३७) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ३५५ (आतापर्यंत एकूण ११ हजार २९९), नाशिक मंडळात १३९ (आतापर्यंत एकूण ३६५२), औरंगाबाद मंडळ २१ (आतापर्यंत एकूण २५६२), कोल्हापूर मंडळ २४ (आतापर्यंत एकूण १३८३), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ५३२), अकोला मंडळ २६ (आतापर्यंत एकूण १४४८), नागपूर मंडळ ५९ (आतापर्यंत एकूण ११७९) रुग्णांचा समावेश आहे. राज्यात काल २०८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७२ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १३६ मृत्यू मागील कालावधीत आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ८२, सोलापूर- १३, नाशिक- १०, नवी मुंबई- ०९, जळगाव- ०८, कल्याण डोंबिवली- ०५, ठाणे- ३, उल्हास नगर- ०१, भिवंडी-१, पिंपरी चिंचवड -१ अकोला- १, सातारा -१ यांचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४. ७२ टक्के इतका आहे. तर, आज राज्यात ३८९० नवीन रुग्णांचे निदान झाल्यानं एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार ९०० झाली आहे.