सूर्यग्रहण Live: पाहा, मुंबई, नगरमधील ग्रहणाची पहिली झलक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 21, 2020

सूर्यग्रहण Live: पाहा, मुंबई, नगरमधील ग्रहणाची पहिली झलक

https://ift.tt/2Ykessf
सन २०२० मधील पहिले ज्येष्ठ महिन्यातील अमावास्येला म्हणजेच रविवार, २१ जून २०२० रोजी लागणार आहे. हे संपूर्ण भारतात दिसणार आहे. मात्र, देशाच्या काही भागातून ते खग्रास, तर काही भागातून कंकणाकृती प्रकारचे दिसेल. राष्ट्रीय पातळीवर हे सर्वप्रथम द्वारका येथून सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुरू होणार असून, सकाळी ११ वाजून ३० मिनिटे ते दुपारी १२ वाजून १८ मिनिटे हा देशभरातील विविध ठिकाणी सूर्यग्रहणाचा मध्य असेल. तर, दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी संपूर्ण देशातील सूर्यग्रहण समाप्त होईल. जाणून घेऊया ग्रहणकाळातील लाइव्ह अपडेट्स... सूर्यग्रहणाचे लाइव्ह अपडेट्स... - नाशिकमधील रामकुंडावर पाण्यात नामस्मरण करताना भाविक (व्हिडिओः सतीश काळे) - मुंबईतील अंधेरी-सकिनाका परिसरामधील एका इमारतीवरून सूर्यग्रहण पाहताना खगोलप्रेमी - नाशिकच्या ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिरात सूर्यग्रहणकाळात जलाभिषेक; मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद - अहमदनगर शहरातील सूर्यग्रहणाची ११ वाजून ५ मिनिटांची स्थिती - कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात ग्रहणकाळातील पूजापाठ सुरू; मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णतः बंद - सूर्यग्रहणामुळे जम्मू-काश्मीरातील वैष्णोदवी मंदिरातील आरतीच्या वेळा बदलल्या - सूर्यग्रहणामुळे देशभरातील अनेक मंदिरे कालपासून बंद - राजस्थानातील जयपूरमधील सूर्यग्रहणाची एक झलक - हरयाणातील कुरुक्षेत्रामध्ये सूर्यग्रहण दिसण्यास सुरुवात - अहमदनगर: फोटो निगेटिव्हच्या सहाय्याने सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेताना नागरिक - नागपूर: ढगाळ वातावरणात सूर्य दर्शनाने खगोल अभ्यासक व हौशिंमध्ये उत्साह - गुजरातमधील गांधीनगर येथे सूर्यग्रहण दिसण्यास सुरुवात - मुंबईतील सूर्यग्रहणाची पहिली झलक - अहमदनगर: ढगांमुळे ऊन सावल्यांचा खेळ; सूर्यग्रहण पाहण्यात अडथळा - नाशिकः सुरक्षित वावर पालन करून आम्हाला तीर्थक्षेत्रवर नामस्मरण करू द्या; पुरोहितांची मागणी, भाविक येण्यास सुरुवात - नाशिकः ग्रहण काळात रामकुंडावर पाण्यात नामस्मरण करण्यासाठी पोलिसांनी केली बंदी; पुरोहित आणि पोलिसांचा वाद - सन २०२० मधील पहिल्या सूर्यग्रहणाला मुंबईत सुरुवात - अबुधाबीसह आखाती देशांमध्ये सूर्यग्रहण दिसण्यास सुरुवात - जम्मू-काश्मीरमध्येही सूर्यग्रहण दिसण्यास सुरुवात - देशातील राजस्थानमध्ये सूर्यग्रहण दिसण्यास सुरुवात - २१ जून वर्षातील सर्वांत मोठा दिवस; उत्तरायण संपून दक्षिणायनास सुरुवात - घरीच राहून लुटा मुंबईतील सूर्यग्रहणाचा आनंद; नेहरू तारांगण संस्था करणार फेसबुक लाइव्ह - चारधाम मंदिरे काल रात्री १० वाजल्यापासून बंद; ग्रहणानंतर होणार विधिवत पूजन - सूर्यग्रहणामुळे तिरुपती मंदिर आज दिवसभर बंद; भाविकांना दर्शनासाठी उद्या खुले होणार - ग्रहणकाळात तुळजाभवानी मातेची मूर्ती सोवळ्यात ठेवणार; ग्रहणानंतर पंचामृत स्नान, पूजन व धूपारती होणार - जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. - जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. - ग्रहणाबाबत अनेक धार्मिक मान्यता असून, ग्रहणकाळात अनेक पथ्ये पाळण्याचे आवाहन केले जाते - या ग्रहणात सूर्य सुमारे ९५ ते ९९ टक्के झाकला जाईल; तज्ज्ञांचे मत - या सूर्यग्रहणाचा अनुभव उघड्या डोळ्यांनी घेऊ नये. ग्रहण पाहण्याच्या सुरक्षित पद्धतींचा वापर करावा; तज्ज्ञांचा सल्ला - सन २०२० मधील पहिले सूर्यग्रहण भारतासह चीन, आफ्रिका, कांगो, इथोपिया, नेपाळ, पाकिस्तान या देशांमधूनही दिसणार - शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील दर्शन बंद राहणार; ग्रहणकाळातील वेळापत्रकाचा तपशील पाहा - मुंबईसह महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल; तज्ज्ञांचे मत - देशाच्या काही भागात खग्रास, तर काही भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार - मुंबई आणि मुंबई उपनगरात सकाळी १० वाजता ग्रहण सुरू होणार - सन २०२० मधील पहिले सूर्यग्रहण राष्ट्रीय पातळीवर ९ वाजून ५६ मिनिटांनी सुरू होणार