'MCX'ची दमदार कामगिरी; भागधारकांना मिळणार घसघशीत लाभांश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 6, 2020

'MCX'ची दमदार कामगिरी; भागधारकांना मिळणार घसघशीत लाभांश

https://ift.tt/376tZ1m
मुंबई : भारतातील सर्वात मोठे वस्तू वायदे बाजारमंच असलेल्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंज ऑफ इंडियाला (MCX) ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत ६०.९५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. ज्यात गत वर्षाच्या तुलनेत ७ टक्के वाढ झाली. मागील वर्षातील दमदार कामगिरीमुळे कंपनीच्या संचालक मंडळाने ३०० टक्के (प्रति समभाग ३० रुपये) लाभांशाची शिफारस केली असून लवकरच त्यावर सर्वसाधारण सभेत निर्णय होणार आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये वस्तू वायदे क्षेत्रात एक्सचेंजचा बाजार हिश्श्यामध्ये ९१.६० टक्क्यांवरून (२०१९ मधील) ९४.०१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. वस्तू वायदे कॉन्ट्रॅक्ट्सची दैनंदिन सरासरी उलाढाल (एडीटी) मागील २०१९ मधील २५,६४८ कोटी रुपयांच्या तुलनेत २६ टक्क्यांनी वाढून ३२,४२४ कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या आर्थिक वर्षात बेस मेटलच्या (धातू) ७४,२०६ मेट्रिक टन इतकी डिलिव्हरी एक्सचेंज प्रणालीतून झाल्याचे MCXने म्हटलं आहे. आर्थिक वर्ष २०२० च्या चौथ्या तिमाहीत एमसीएक्सला एकूण १३४.९४ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. ज्यात २२ टक्के वाढ झाली.याच तिमाहीत निव्वळ नफा ६०.९५ कोटी रुपयांवरून (३१ मार्च २०१९ अखेर) ६५.५० कोटी रुपये झाला. यामध्ये ७ टक्के वाढ झाली. कर पूर्व नफ्याचे (ईबिटा) प्रमाण हे ३१ मार्च २०२० अखेर २४ टक्क्यांनी वाढून ७०.३५ कोटी रुपये झाले आहे. ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात देखील एमसीएक्सची कामगिरी बहरली आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात एमसीएक्सचे एकूण उत्पन्न ५०३.११ कोटी रुपयांपर्यंत वाढले. २३६.५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. ज्यात ६२ टक्के वाढ झाली. कंपनीच्या संचालक मंडळाने ३०० टक्के (प्रति समभाग ३० रुपये) लाभांशाची शिफारस केली असून, कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारणसभेत भागधारकांकडून त्याला मंजुरी मिळविली जाईल, असे कंपनीने म्हटलं आहे.