मुंबईसह महाराष्ट्राची चिंता वाढवणारे आज दुपारपर्यंत अलिबागच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेगही वाढला आहे. जाणून घेऊया वादळाबाबतचे सर्व अपडेट्स: लाइव्ह अपडेट्स (Live Updates): >> वाऱ्याचा सध्याचा ताशी वेग किलोमीटरमध्ये असा... गोवा: ३३, हर्णे: २६, कुलाबा: ३३, सांताक्रूझ: ९, डहाणू: ७ >> वेगाने पुढे सरकतंय. कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला वाचा: >> वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आपत्कालीन यंत्रणा सज्ज >> चक्रीवादळ मुंबईच्या आणखी जवळ. सकाळी साडेसहा वाजताच्या स्थितीनुसार अलिबागपासून १५५ किलोमीटर तर मुंबईपासून २०० किलोमीटर अंतरावर वादळ पोहोचल्याची हवामान विभागाची माहिती. >> मुंबईत पहाटेपासूनच वादळी वारे. सांताक्रूझ वेधशाळेकडून ताशी २२ कि.मी वेगाने वारे वाहत असल्याची नोंद. >> 'निसर्ग' मुंबईपासून २५० कि.मी. अंतरावर तर अलिबागपासून २०० कि.मी. अंतरावर. पहाटे पाच वाजताची स्थिती