मुंबई: व्हायरसच्या संकटात सुरुवातीपासून मदतकार्यात पुढे असणारा अभिनेता यानं नुकतीच एक नवी आणली आहे. सध्या ही फिल्म चर्चेत आहे. करोना संकटातून पुढे वाटचाल कशी करायची हे सांगणारी ही फिल्म असून, आत्मनिर्भर होण्याचा संदेश यातून देण्यात येतोय. 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेवर आधारित ही शॉर्ट फिल्म आहे. अक्षयनं आपल्या ट्विटर हँडलवर ही छोटी क्लिप शेअर केली आहे. ज्यात तो खेड्यात राहणाऱ्या एका माणसाच्या भूमिकेत दिसतो. शॉर्ट फिल्मच्या सुरुवातीला, खिलाडीकुमार चेहऱ्यावर मास्क घालून जाताना दिसतो. गावचे वयोवद्ध सरपंच त्याला रोखण्याचा प्रयत्न करतात. त्यांना उत्तर देताना अक्षय, आपण पुन्हा कामाला जात आहोत, असं सांगतो. 'पण करोनाच्या काळात हे कसं शक्य आहे?' असा प्रश्न सरपंच त्याला विचारतात. या प्रश्नाला उत्तर देताना अक्षय म्हणतो, की 'आपण स्वत: काळजीपूर्वक वागल्यास करोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी आहे. अगदी चुकून संसर्ग झालाच तर हजारो लोकांप्रमाणे आपण बरेही होऊ शकतो.' आपण सावधगिरी कशी बाळगायची ते सांगताना तो पुढे म्हणतो, की 'रखडलेल्या जीवनाला आता पुढे घेऊन जा. देशाला आत्मनिर्भर करा. जय हिंद. हा व्हिडिओ पोस्ट करत आहे.' असं त्यानं यासोबत लिहिलं आहे. अक्षय कुमारने भरभरून केलं दान अक्षय कुमारने करोना व्हायरसच्या या लढाईत भरभरून मदत केली आहे. त्याने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २५ कोटी रुपयांची मदत केली याशिवाय बीएमसीला तीन कोटीआणि सिन्टा या संस्थेला ४५ लाखांची मदत केली आहे. पोलिसांसाठी देखील त्यानं विशेष मदत केली आहे.