रिलायन्स म्हणजे फायदा; करोना तिमाहीत दे दणादण कामगिरी; नफा वाढला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 31, 2020

रिलायन्स म्हणजे फायदा; करोना तिमाहीत दे दणादण कामगिरी; नफा वाढला

https://ift.tt/30dnBDB
नवी दिल्ली: यांच्या नेतृत्वाखालील इडस्ट्रीज लिमिटेड ()ने आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत नफा कमवला आहे. पहिल्या तिमाहीत करोना व्हायरसचे भले मोठे संकट असताना देखील रिलायन्सने दमदार कामगिरी केली आहे. वाचा- कंपनीने गुरुवारी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत रिलायन्सला १३ हजार २४८ कोटी इतका शुद्ध लाभ झाला आहे. त्याच बरोबर जिओच्या प्रति युझर सरासरी महसूल या तिमाहीत ७.४ टक्के इतका झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत रिलायन्सचा हा नफा ५४ टक्के म्हणजे अधिक ४ हजार ३८८ कोटी रुपये अधिक आहे. जाणकारांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा हा नफा अधिक असल्याचे दिसून येते. वाचा- रिलायन्सच्या शेअरच्या दरात आणि कंपनीच्या बाजार भांडवलात देखील तेजी दिसून आली आहे. कंपनीचे बाजार भांडवल १४ लाख कोटीच्या पुढे गेले आहे. अशी कामगिरी करणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली. गुरुवारी आरआयएलचे शेअर ०.६१ टक्क्यांनी म्हणजेच १२.८० रुपयांच्या तेजीसह २ हजार १०८.६५ अंकांवर बंद झाले. २७ जुलै रोजी रिलायन्सचा शेअर २ हजार १९८.७० या विक्रमी स्थरावर पोहोचला होता. वाचा- जून २०२०च्या तिमाहीती कंपनीचा महसूल १,००,९२९ कोटी रुपये इतका राहिला आहे. जे गेल्या तिमाहीत १,५१,४६१ कोटी इतका होता. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १, ७४,०८७ कोटी इतका होता. वाचा- रिलायन्समधील जिओ कंपनीने जून तिमाहीत २ हजार ५२० कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला आहे. याआधी मार्च तिमाहीत जिओने २ हजार ३३१ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. देशात करोना व्हायरसमुळे वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढल्यामुळे जिओच्या डेटाची मागणी अधिक वाढली.