पुलवामा: चकमकीत १ दहशतवादी ठार, २ जवान जखमी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 7, 2020

पुलवामा: चकमकीत १ दहशतवादी ठार, २ जवान जखमी

https://ift.tt/3f1zHoq
श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील येथील गुसू येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. तर या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. गुसू भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या हाती आल्यानंतर त्यांनीभागाला घेरले. त्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनी गोळीबार सुरू केला. यात झाला. पोलिस दलातील एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने या चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या भागात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची सूत्रांची माहिती आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरूच आहे. सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी केला होता हल्ला या पूर्वी ५ जुलै या दिवशी पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी आय़ईडी स्फोट करत निशाणा साधला होता. या स्फोटानंतर दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर गोळीबार करणे सुरू केले. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेरले. वाचा: या बरोबरच तीनच दिवसांपूर्वी ४ जुलैला जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. तर या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील आरा भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी या भागाला घेराव घातला. त्यानंतर या भागात शोधमोहीम हाती घेतली. दहशतवाद्यांचा शोध घेत असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांच्या दिशेने गोळीबार करणे सुरू केले. वाचा: गेल्या महिन्याभराच्या काळात जम्मू आणि काश्मीरमधील विविध भागांमध्ये सुरक्षादले आणि दहशतवाद्यांमध्ये १९ चकमकी झाल्या. यात एकूण ५२ दहशतवादी मारले गेले. तर या महिन्यात १ जुलेला झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता. वाचा: