वाचा: आजच्या ठळक बातम्या अगदी मोजक्या शब्दांत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 4, 2020

वाचा: आजच्या ठळक बातम्या अगदी मोजक्या शब्दांत

https://ift.tt/3ivDwEn
कल्याण: अत्यवस्थ रुग्णांना उपचारांसाठी शहरातील करारान्वये ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालये आणि पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले जात असून या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज पडते. दररोज अत्यवस्थ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयात धाडले जात असताना यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. शुक्रवारी सकाळी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर संपल्यानंतर तब्बल तीन तास सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागली. या काळात दोन अत्यवस्थ रुग्ण ऑक्सिजनअभावी तडफडत होते! मुंबई : लॉकडाउन शिथिल होताच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवण्यास सुरुवात केली होती. ७ जूनपासून कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. यावर नागरिकांमध्ये संतापाची लाट होती. याशिवाय विरोधी पक्षांनी सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. या आठवड्याच्या सुरुवातीलाच देशभर पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात आंदोलने झाली. गेल्या सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये शेवटची दरवाढ केली होती. त्यानंतर सलग पाच दिवस इंधन दर स्थिर ठेवले आहेत. मुंबई: मुंबईसह राज्यात करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना अशा रुग्णालयात प्रवेश देण्याचा विचार आहे. त्यासाठी अशा रुग्णालयात एक जागा ठेवून तेथे रुग्ण व त्याच्या नातेवाईकास बोलता येईल. तसेच आयसीयूमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आदेशही देण्यात आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. भोसरीतील खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. पुणे: गेल्या काही दिवसांत शहरात वाढत असलेली करोनाबाधितांची संख्या पाहता, आता रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनातून चालकासह केवळ तीन व्यक्तींनाच शहरात प्रवेश करण्याची परवानगी असणार आहे. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्ती जमविण्यासदेखील मनाई केली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी माहिती दिली. नवी दिल्लीः आपल्या युजर्संसाठी लागोपाठ नवीन नवीन प्लान घेऊन येत आहे. नवीन प्लान्समध्ये युजर्संना जास्तीत जास्त डेटा आणि फ्री कॉलिंगचा फायदा दिला जात आहे. युजर्संसाठी सुद्धा कंपनी अनेक जबरदस्त प्लान घेऊन आली आहे. आम्ही तुम्हाला जिओफोनचे दोन जबरदस्त आणि स्वस्तातील प्लानसंबंधी सांगणार आहोत. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेटा सुद्धा मिळतो. जाणून घ्या जिओफोनच्या या दोन प्लानमध्ये काय-काय फायदा मिळतो.