कार्तिकी गायकवाडचा पार पडला साखरपुडा; लवकरच अडकणार विवाहबंधनात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 28, 2020

कार्तिकी गायकवाडचा पार पडला साखरपुडा; लवकरच अडकणार विवाहबंधनात

https://ift.tt/2De9FQG
पुणे: सारेगमप लिट्ल चॅम्पसची विजेती व लाईव्ह शो करणारी आता आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. कार्तिकी लवकरच विवाहबंधवनात अडकणार नुकताच तिचा साखरपुडा पार पडला. कार्तिकीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. गेल्या महिन्यात कार्तिकीच्या घरी कांदेपोह्याचा म्हणजेच पाहण्याचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांच्या मित्राच्या मुलासोबत कार्तिकींच लग्न ठरलं असून २६ तारखेला साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला आहे. असं कार्तिकीच्या होण्याऱ्या पतीचं नाव आहे.रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या तरी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला आहे. परंतु लग्नाची तारीख ठरली नाही,अशी माहिती स्वतः कार्तिकी गायकवाडनं दिली आहे. तसंच 'हे सगळं अचानक ठरलं. आमचं अरेंज मॅरेज असून वडिलांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे,' असं कार्तिकी सांगते. सारेगमप लिटिल चॅम्स मराठीच्या पहिल्या पर्वाची कार्तिकी विजेती ठरली. कार्तिकी सध्या गायिका म्हणूनआपल्या सर्वांनाच माहीत आहे. कार्तिकीनं 'गजर कीर्तनाचा' या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून प्रेक्षकांसमोर आली होती.