मुस्लिम फोटोग्राफर नको... माजी आमदाराच्या भूमिकेमुळे वाद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 2, 2020

मुस्लिम फोटोग्राफर नको... माजी आमदाराच्या भूमिकेमुळे वाद

https://ift.tt/31xWZ1n
म.टा. प्रतिनिधी, नगर करोनाचे संकट वाढत असताना नागरिक आणि प्रशसानातही अस्वस्थता वाढत आहे. अशावेळी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज असताना नगरमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी आपला राजकीय अभिनिवेष जिवंत ठेवला आहे. आपसांत राजकारण करताना अन्य घटकांच्या बाबतीतही त्यांची जुनी तत्वे कायम आहेत. महापालिकेत अशी एक घटना घडल्याची तक्रार आली आहे. तेथे शिवसेनेचे माजी आमदार यांनी मुस्लिम फोटोग्राफर नको, अशी भूमिका घेत त्याला बैठकीचा फोटो काढण्यास मज्जाव केल्याची तक्रार आहे. तर राठोड यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रेस फोटग्राफर साजिद शेख यांनी यासंर्दभात तक्रार केली आहे. पत्रकार संघटनांनी याची दखल घेऊन घटनेचा निषेध केला आहे. शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे की, कापड बाजारासह प्रमुख बाजारपेठ बफर झोनमध्ये आली आहे. तेथील निर्बंध उठवावेत, या मागणीचे निवेदन देण्यासाठी व्यापारी संघटना महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आपण तेथे फोटो काढण्यासाठी गेलो. तेथे माजी आमदार राठोड हेही व्यापाऱ्यांसोबत होते. व्यापाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही कोणता फोटोग्राफर आणला आहे. यावर व्यापाऱ्यांनी उत्तर दिले की साजिद शेख आले आहेत. त्यावर राठोड म्हणाले की तुम्हाला माहिती नाही का, की आपण मुस्लिम समाजाचा फोटोग्राफर बोलवत नाही. आम्ही आपल्या छायाचित्रकाराला कार्यक्रमासाठी बोलवत असतो. आपला फोटोग्राफर बोलवा. असे म्हणून राठोड यांनी आपल्याला फोटो काढू देण्यास नकार दिला. त्यामुळे आपण फोटो न काढता परत आलो. वाचा: शेख यांच्या या तक्रारीवर तीव्र पडसाद उमटू लागले. पत्रकार संघटनांनीही निषेध केला. त्यावर राठोड यांनी आपली बाजू मांडणारे पत्र पाठविले. त्यामध्ये म्हटले आहे की, शेख यांचे पत्र वाचण्यात आले. त्यामधील मजकूर चुकीचा व खोटा आहे. आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत. समाजात दुही माजविण्याचे काम कधीही केले नाही. पत्रात उल्लेख केलेल्या शब्दाशी माझा काहीही संबंध नाही. त्यानंतर व्यापाऱ्यांनी निवेदन दिले. फोटो काढण्यासाठी दुसरे फोटोग्राफर बोलाविण्यात आले. बाजारपेठेतील बफर झोन उठविण्याची मागणी व्यापाऱ्यांनी आयुक्तांकडे केली. आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी आपण जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन व्यापारी संघटनांना दिले. लॉकडाउनच्या सुरवातीच्या टप्प्यात राजकीय वातावरण शांत होते. जसजशी शिथीलता देण्यात आली, तसे राजकारणही सुरू झाले आहे. स्थानिक पातळीवरही याचा प्रत्यय येऊ लागला आहे. करोना उपायोजनांवरून एकमेंकावर आरोप करून कोंडीत पकडण्याचे प्रकारही सुरू झाले आहे. याशिवाय मदत मिळवून देण्याच्या श्रेयवादाचे राजकारणही सुरू झाले आहे. एकमेकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यास भार पाडणे, एखाद्या भागात रुग्ण वाढले तर त्यावरून संबंधित राजकीय नेत्यावर आरोप करणे, असे प्रकारही नगर जिल्ह्यात सुरू झाले आहेत. ही सर्व राजकीय मंडळी कशी आहेत, हे जनतेला चांगलेच ठावूक आहे. मात्र, करोनाच्या संकटात एकजुटीने काम करण्याऐवजी या काळातही ही मंडळी आपली राजकीय अस्तित्व जपण्याला महत्व देत असल्याचे जनतेला पहावे लागत आहे.