मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणून शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं शिवसेनेचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत करणारे देशातील एक दिग्गज राजकीय नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत व आताचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वातील फरक सांगितला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ( to Saamana) वाचा: येत्या ११ जुलैपासून शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'तून ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या शरद पवार यांनी या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. लॉकडाऊनपासून ते राम मंदिर आंदोलनाच्या विषयावरही पवारांनी मतं मांडली आहेत. देशाच्या राजकारणातील किस्से आणि अनुभव सांगितले आहेत. बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत पवार यांनी व्यक्त केलेली मतं हा यातील सर्वाधिक उत्सुकतेचा मुद्दा ठरणार आहे. वाचा: गेली ५५ वर्षे राजकारणात असलेल्या शरद पवार यांनी विरोधक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण जवळून पाहिलं आहे. बाळासाहेबांशी त्यांचे राजकारणापलीकडचे मित्रत्वाचे संबंध होते. काही काळ उद्धव ठाकरे हेही पवार यांच्या विरोधकाच्या भूमिकेत होते. मात्र, आता ते मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार चालवत आहेत. पवारांशी सातत्यानं चर्चा करत आहेत. त्यांची कामाची पद्धत, नेतृत्व याबद्दल पवारांना काय वाटतं, हे पवारांनी या मुलाखतीतून सांगितलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत, याबाबतची उत्कंठा वाढली आहे. संजय राऊत यांनी आपल्या फेसबुक पेजवर या मुलाखती संदर्भातील व्हिडिओ टीझर टाकला आहे. 'एक शरद, सगळे गारद!! महाराष्ट्रातील सत्ता बदल हा अपघात होता काय?' असा मथळा असलेला हा व्हिडिओ उत्सुकता वाढवणारा ठरला आहे. राज्यातील तीन पक्षांच्या सरकारविषयी संभ्रमाचं वातावरण असताना, विरोधकांकडून सरकारच्या भवितव्याबाबत उलटसुलट वक्तव्ये केली जात असताना पवारांची ही मुलाखत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळाचं या मुलाखतीकडं लक्ष लागलं आहे. हेही वाचा: हेही वाचा: