चांगली बातमी...जीवघेण्या एड्सपासून मुक्त होणे शक्य! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 9, 2020

चांगली बातमी...जीवघेण्या एड्सपासून मुक्त होणे शक्य!

https://ift.tt/2O5bVvW
साओ पाओलो: प्राणघातक असणाऱ्या आणि आतापर्यंत औषध न सापडलेल्या एड्सवर मात करता येणे शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. ब्राझीलमध्ये एका रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले असून तो आता एड्समुक्त झाला असल्याचा दावा फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलोच्या संशोधकांनी केला आहे. या औषधाची माहिती लवकरच जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणार असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे. जगभरात सुमारे ३८ दशलक्ष एड्सबाधित आहेत. त्यातील १.८ दशलक्ष रुग्ण हे १५ वर्षाखालील आहेत. रोगप्रतिकार शक्ती व इतर औषधांच्या माध्यमातून एड्सबाधितांचे आयुष्य लांबवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, एड्सपासून कायम स्वरुपी मुक्तता करण्यासाठी अद्याप औषध सापडले नव्हते. टाइम नियतकालिकने दिलेल्या वृत्तानुसार, ' २०२०' या ऑनलाइन परिषदेत संशोधकांनी केलेल्या दाव्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. संशोधक डॉ. रिकार्डो डियाज यांनी सांगितले की, यशस्वी उपचार झालेल्या रुग्णाला ऑक्टोबर २०१२ मध्ये एड्सची बाधा झाली असल्याचे समोर आले होते. या रुग्णावर चाचणी करताना एड्सच्या औषधांचा वापर थांबवण्यात आला होता. त्याऐवजी दर दोन महिन्याला अँटीरेट्रोव्हायरल औषधे आणि निकोटीनामाइड औषधांचे मिश्रण असलेले नवीन औषध देण्यात आले. एक वर्षानंतर या रुग्णाची रक्त चाचणी करताना त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याचे संशोधकांनी म्हटले. मात्र, रुग्णाच्या शरीरात विषाणूचा खात्मा करण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अॅण्टीबॉडीची पातळी किती होती, याबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही. गोपनीयता कायद्यानुसार, रुग्णाची ओळख जाहीर करण्यात आली नाही. दरम्यान, आपल्याला हे नवीन आयुष्य मिळाले असल्याचे रुग्णाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. एड्समुक्त झालो असल्यामुळे हे औषध इतर लाखो रुग्णांसाठी नवीन आशा असल्याचेही त्याने सांगितले. स्टेम सेल ट्रान्सप्लांटशिवाय एड्सला मात देणे शक्य झाले आहे. याआधी लंडनमध्ये एका रुग्णाला स्टेम सेल ट्रान्सप्लांटकरून एड्समुक्त करण्यात आले होते. त्यामुळे फक्त औषधोपचाराने एड्सला मात दिलेला ब्राझीलमधील रुग्ण हा पहिलाच रुग्ण ठरला आहे. तर, याआधीदेखील काही औषधांचे मिश्रण करून एड्सबाधितांवर उपचार करण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, त्याला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे ब्राझीलमध्ये झालेल्या या प्रयोगाबाबत आणखी संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. आणखी वाचा: