शेअर बाजार ; सेन्सेक्स-निफ्टीची भरपाई झाली पुढे काय ? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 10, 2020

शेअर बाजार ; सेन्सेक्स-निफ्टीची भरपाई झाली पुढे काय ?

https://ift.tt/3gNVOzj
मुंबई : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)ला जूनच्या तिमाहीत बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी महसूल मिळाला. कॉरपोर्रेट्सच्या कामगिरीला करोनाने जबर दणका दिला आहे. त्यामुळे टीसीएसचे निराशाजनक निकाल बाजाराची दिशा बदलतील, असे कोटक सिक्युरिटीजचे विश्लेषक श्रीकांत चौहान यांनी सांगितले. ते म्हणाले की निफ्टी १०८५० अंकावर गेला तर त्याला ११००० चा स्तर गाठण्यात वेळ लागणार नाही. मात्र दुसऱ्या बजावला त्यात घसरण झाली तर तो १०५५० पर्यंत खाली येईल. देशात करोना रुग्णांची संख्या हजारोंच्यापटीत वाढत आहे. त्यातच गलवान खोऱ्यातील चकमकीप्रकरणी भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. सीमेवर अजूनही तणाव आहे. दरम्यान, करोनासाठी लागू केलेला कठोर लॉकडाउन आता हळुहळू शिथिल करण्यात येत असून अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. त्यामुळे शेअर गुंतवणूकदारांकमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे एंजल ब्रोकिंगचे रुचित जैन यांनी सांगितले. ते म्हणाले की खरेदीचा ओघ आजसुद्धा कायम राहिला तर निफ्टी १०९०० ते ११००० अंकांचा टप्पा सहज ओलांडेल. एचडीएसफसी सिक्युरिटीजच्या दीपक जसानी यांच्या मते 'टीसीएस'च्या निराशाजनक निकालांनी बाजारातील तेजीला ब्रेक बसेल. टीसीएस एक मोठी कंपनी आहे. त्यांचे तिमाही निकालाचे अंदाज चुकल्याने करोनाचा मोठा प्रभाव कंपन्यांवर आहे, हे दिसून येते. त्यामुळे आज बाजारात विक्रीचा दबाव राहील. निफ्टी १०७३३ च्या स्तरापर्यंत खाली येऊ शकते. इंडिया ग्लोबल वीक २०२० मध्ये मनोगत मांडताना गुरुवारी म्हणाले की, भारत ही आशियातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून जगातील ती सर्वाधिक खुली अर्थव्यवस्था आहे. भारतामध्ये गुंतवणूकयोग्य वातावरण असून व्यवसायाची खेळकर स्पर्धा आहे. पंतप्रधानांच्या या भाषणाचा सकारात्मक परिणाम भांडवल बाजारांच्या व्यवहारांवर दिसून आला. वाचा : जागतिक स्तरावर, चिनी भांडवल बाजार वधारल्यामुळे आशियाई भांडवल बाजारांचे चित्र सकारात्मक झाले. शांघाय, हाँगकाँग, टोक्यो आणि सेऊल येथील भांडवल बाजारांनी चांगली कमाई केली. युरोपातील भांडवल बाजारही सकारात्मक स्तरावर उघडले. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेन्ट क्रूड ०.०५ टक्के वाढून ४३.३१ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. त्याचवेळी चलन बाजारात भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तीन पैशांनी वधारला आणि एका अमेरिकी डॉलरला ७४.९९ रुपये मोजावे लागले. वित्त कंपन्या आणि बँका यांवर गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवल्यामुळे दोन्ही शेअर बाजारांचे निर्देशांक गुरुवारी वधारले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४०८.६८ अंकांनी वधारत ३६,७३७.६९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०७.७० अंकांनी वर जात १०,८१३.४५ वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांक चार महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले.