'बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये हा फरक आहे' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 11, 2020

'बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये हा फरक आहे'

https://ift.tt/3gT4pAR
मुंबई: 'बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव यांच्या कार्यपद्धतीत, विशेषत: निर्णय घेण्याच्या बाबतीत मोठा फरक आहे आणि तो राहणारच आहे,' असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज दोन ठाकरेंच्या कार्यपद्धतीतील फरक सांगितला. ( on CM ) वाचा: शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ''साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी लॉकडाऊन, आघाडी सरकारचा कथित रिमोट कंट्रोलपासून ते भाजप, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली. वाचा: राजकीय विरोधक म्हणून शरद पवार यांनी अनेक वर्षे बाळासाहेबांना जवळून पाहिले होते. त्याशिवाय त्यांच्यात एक सुसंवादही होता. उद्धव ठाकरे हे थेट राजकीय मित्र म्हणूनच आता पवारांसोबत काम करत आहेत. त्यामुळं बाळासाहेब आणि उद्धव यांच्या कार्यशैलीतील फरकही त्यांना दिसतो आहे. त्यावर पवार यांनी मुलाखतीत भाष्य केलं. लॉकडाऊन करण्याच्या आणि नंतर शिथिल करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाबद्दल बोलताना त्यांनी हा फरक सांगितला. 'उद्धव ठाकरे हे निर्णय घेताना अत्यंत सावधगिरीनं घेतात. निर्णयाचे दुष्परिणाम होणार नाही ही खातरजमा जेवढी करून घेता येईल तेवढी करायची आणि मग पाऊल टाकायचं. एकदा पाऊल टाकलं की मागे घ्यायचं नाही ही त्यांची कार्यपद्धती आहे. बाळासाहेब तडकाफडकी निर्णय घ्यायचे. परिणामांची तमा बाळगायचे नाहीत. हा फरक दोघांमध्ये आहे आणि तो राहणारच आहे,' असं पवार म्हणाले. अर्थात, 'परिस्थितीमध्येही फरक आहे. बाळासाहेब हे सत्तेच्या पाठीमागचे घटक होते. उद्धव ठाकरे यांच्यावर सत्ता प्रत्यक्ष कृतीत आणण्याची जबाबदारी आहे,' याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.