'लालबागचा राजा'चा गणेशोत्सव रद्द; यंदा फक्त आरोग्यउत्सव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 1, 2020

'लालबागचा राजा'चा गणेशोत्सव रद्द; यंदा फक्त आरोग्यउत्सव

https://ift.tt/31yUjke
मुंबई: करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर '' गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक भान जपत यंदा आरोग्यउत्सव साजरा करण्याचं मंडळानं ठरवलं आहे. वाचा: 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीयांनी आपापले सण साधेपणाने व शक्यतो घरात राहूनच साजरे करावेत, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच केलं आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत बैठकाही घेतल्या होत्या. या बैठकींमध्ये उत्सव नेमका कसा साजरा करायचा, मूर्तीची उंची किती असावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे करावे, या संदर्भात चर्चा झाली होती व मंडळांना याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अनेक मंडळांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून उत्सवात बदल करण्याचे निर्णय घेतले होते. मुंबईतील गणेश गल्ली येथील 'मुंबईचा राजा' मंडळानंही यंदा उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना न करता केवळ पूजेची मूर्ती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळानं आगमन मिरवणूक व पाटपूजन सोहळा रद्द केला आहे. अन्य अनेक मंडळांनीही असेच निर्णय घेतले आहेत. 'लालबागच्या राजा' मंडळानं त्याही पुढं जाऊन उत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी राजाच्या मंडपात रक्तदान व प्लाझ्मा दानाची शिबिरं घेतली जातील, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळं 'लालबागचा राजा' यंदा भक्तांना अगदी वेगळ्या रूपात दर्शन देणार हे स्पष्ट झालं आहे. लालबागचा राजा मंडळाकडून आज पत्रकार परिषद घेतली जाणार असून मंडळाच्या निर्णयांची माहिती दिली जाणार असल्याचे समजते.