सराफा तेजीत ; अनलाॅकनंतर बाजारात सोन्याची मागणी वाढली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 6, 2020

सराफा तेजीत ; अनलाॅकनंतर बाजारात सोन्याची मागणी वाढली

https://ift.tt/2ZAXrt4
मुंबई : करोना रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन टप्याटप्यात शिथिल करण्याची प्रक्रिया वेग धरत आहे. अनलॉकमध्ये आता मंगल विधी कार्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. परिणामी लॉकडाउनमध्ये रखडलेली लग्न कार्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सराफा बाजार देखील पूर्वपदावर येत असून सोन्याची मागणी वाढली असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नजीकच्या काळात राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. goodreturns.in या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६४६० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४७४६० रुपये झाला आहे. त्यात शनिवारच्या तुलनेत ४० रुपयांची घसरण झाली आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४७१२० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८३२० रुपये आहे. दिल्लीत सोने ४० रुपयांनी स्वस्त झाले आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४७२६० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८५६० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२४० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५०८५० रुपये झाला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात गेले तीन महिन्यांहून अधिककाळ सुरु असलेल्या लॉकडाउनचा सराफा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.चालू आर्थिक वर्षातील एप्रिल आणि मे महिन्यात ७९.१४ दशलक्ष डॉलर्सची आयात करण्यात आली. तर गेल्या आर्थिक वर्षात याच दोन महिन्यात ८.७५ अब्ज डॉलर्सचे सोने आयात करण्यात आले होते. सोने आयात निम्म्याहून जास्त घटल्याने सरकारी तिजोरीवरील ताण मात्र कमी झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोने २३७ रुपयांनी वधारले आणि १० ग्रॅमला ४९०२२ रुपये भाव झाला. गुरुवारी सोन्याचा हवं ४८७८५ रुपये होता. चांदीला मात्र नफेखोरीचा फटका बसला. शुक्रवारी चांदीचा भाव ७४० रुपयांनी कमी झाला. चांदीचा एक किलोचा दर ४९०६० रुपये झाला आहे. जळगावात गुरुवारी सोन्याच्या भावाने ५० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सकाळी सराफ बाजार उघडल्यानतंर सोन्याचा भाव ४९ हजार २०० तर जीएसटीसह ५१ हजार ५०० रुपयांवर पोहचला होता. जागतिक बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव ०.२२ टक्क्यांनी कमी होऊन १७८६.१० डॉलर प्रती औंसवर बंद झाला. चांदीचा प्रती औंस भाव १८.२३ डॉलरपर्यंत खाली आला आहे.