Happy Birthday Sunil Gavaskar सर डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडणारा भारतीय फलंदाज! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 10, 2020

Happy Birthday Sunil Gavaskar सर डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडणारा भारतीय फलंदाज!

https://ift.tt/38J0bsH
नवी दिल्ली: विश्वात ज्यांची ओखळ द डॉन अशी केली जाते असे ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडणे म्हणेज साधी सुधी गोष्ट नव्हे. भारताच्या एका फलंदाजाने आपली एकाग्रता आणि सर्वोत्तम तंत्र याचा वापर करून ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकला होता. भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील मनोहर गावसकर यांचा आज वाढदिवस होय. गावसकर यांचा जन्म १० डिसेंबर १९४९ रोजी मुंबईत झाला. गावसकर यांनी करिअरमध्ये जगातील सर्वोत्तम आक्रमक गोलंदाजीचा सामना केला. वाचा- १९७०-७१ साली जेव्हा गावसकर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध करिअरची सुरूवात केली. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांनी चार शतकंसह ७७४ धावा केल्या त्यांची सरासरी १५४ इतकी होती. येथूनच सुरू झाला क्रिकेट आणि गावसकर यांचा रोमान्स. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध १३ कसोटी सामने खेळले त्यात ७०च्या सरासरीने ७ शतक केली. उलट इंग्लंडविरुद्ध त्यांची सरासरी ३८ इतकी होती. वाचा- गावस्कर यांनी भारताकडून ३४ कसोटी शतक केली. यातील २२ सामने ड्रॉ झाले. त्यांनी सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ शतकांचा विक्रम मागे टाकला होता. या शिवाय कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे ते पहिले फलंदाज आहेत. त्यांनी सलग १०० कसोटी सामने खेळणारे पहिले फलंदाज होण्याचा मान मिळवला. १९८० साली विस्डेनने क्रिकेटर ऑफ द इअर साठी निवड केली. २००९ साली आयसीसी हॉल ऑफ द फेममध्ये त्यांचा समावेश झाला. तर २०१२ साली सीके नायडू लाइफ टाइम अचव्हमेंट पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवीले आहे. सर्वात धीमी फलंदाजी १९७५ साली झालेल्या पहिल्या वर्ल्ड कप स्पर्धेत गावसकर यांनी इंग्लंडविरुद्ध सर्वात धीमी फलंदाजी केली. त्यांनी १७४ चेंडूत फक्त नाबाद ३६ धावा केल्या. त्यांच्या या खेळीची आज देखील चर्चा होते. ( ) गावसकर यांनी १२५ कसोटी आणि १०८ वनडे खेळल्या. कसोटीत त्यांनी १० हजार ११२ तर वनडेत ३ हजार ९२ धावा केल्या. कसोटी त्यांनी ३४ शतक आणि ४५ अर्धशतक केली.