मनमोहन की अँटनी? काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदावर आज निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 24, 2020

मनमोहन की अँटनी? काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदावर आज निर्णय

https://ift.tt/3hnW5JL
नवी दिल्ली: दिल्लीत आज होत असलेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या (Congress Working Commitee) महत्वाच्या बैठकीपूर्वीच पक्ष नेतृत्वाच्या मुद्द्यावर पक्षात दोन गट झालेले पाहायला मिळत आहेत. काँग्रेसमधील एका गटाला () हेच पुन्हा अध्यक्ष हवे आहेत. काही नेत्यांनी पक्षाध्यक्षा () यांना तसे पत्रच पाठवले आहे. तर दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पक्षाचे इतर अनेक ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. गांधी-नेहरू कुटुंबच पक्षाला एकजूट राखू शकतात, असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला आहे. (who will be the new party?) मनमोहन, अँटनी आणि वासनिक स्पर्धेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना थेट अध्यक्ष बनवण्याची जोखीम काँग्रेस पक्ष सध्या घेऊ इच्छित नाही. सोनिया गांधी यांनी राजीनामा दिल्यास , ए. के. अँटनी किंवा मग यांच्या पैकी एका नेत्याला पक्षाचा अंतरिम अध्यक्ष बनवण्यात येऊ शकते, असे मानले जात आहे. त्यानंतर करोनाचे संकट दूर झाल्यानंतर पक्ष पुन्हा राहुल गांधी यांच्या हाती पक्षाचे नेतृत्व सोपवेल असे म्हटले जात आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांनी अंतरिम पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त काँग्रेस पक्षाने फेटाळून लावले आहे. सोनिया गांधी यांनी अशा प्रकारची कोणताही विचार व्यक्त केलेला नसल्याचे पक्षाचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वात गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्षाची मागणी राज्यसभेतील विरोधी पक्षनेता गुलामनबी आझाद यांच्यासह एकूण २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून सामूहिक नेतृत्वाची मागणी केली. लोकांमध्ये जाऊन कार्यरत राहील अशा अध्यक्षाची काँग्रेस पक्षाला आज गरज आहे, असे या गटाने म्हटले आहे. नवा काँग्रेसअध्यक्ष मुख्यालयासह प्रदेश काँग्रेस समित्यांच्या मुख्यालयांमध्ये देखील उपलब्ध असला पाहिजे. अमरिंदर सिंह, गहलोत, बघेल, लोकसभेतील कांग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद आणि अश्विनी कुमार यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे जोरदार समर्थन केले आहे. दरम्यान, पक्षात पक्षनेतृत्वाबाबत दोन विचार व्यक्त झालेले असल्याने काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत हंगामा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या तरुण नेत्यांनी राहुल गांधी यांनाच अध्यक्ष बनवण्याची मागणी केली. तसेच युवक काँग्रेसचे नेते देखील राहुल गांधी यांचे समर्थन करत आहेत. मणिकम टागोर यांच्यासह चल्ला वामसी चंद रेड्डी यांनी देखील राहुल गांधींचे समर्थन केले आहे. क्लिक करा आणि वाचा- टागोर यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या सन २०१९ च्या निर्णयाचा हवाला दिला आहे. त्यानुसार काँग्रेसच्या ११००, प्रदेश काँग्रेस समितीच्या ८८०० सदस्यांनी, ५ कोटी कार्यकर्ते आणि १२ कोटी समर्थकांना राहुल गांधी हेच अध्यक्ष हवे होते, असे टागोर यांनी स्पष्ट केले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-