शरद पवारांनी गणरायाला घातले 'हे' साकडे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 24, 2020

शरद पवारांनी गणरायाला घातले 'हे' साकडे

https://ift.tt/31o7F2g
मुंबई: सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील करोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी गणरायाला घातले आहे. शरद पवारांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. 'मनाला प्रसन्न करणारे श्रीगणेशाचे सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी रूप हे मानवासाठी सौख्याचे अधिष्ठान आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. तसंच, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छाही पवार यांनी दिल्या आहेत. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वच नेत्यांनी आपापल्या घरच्या बाप्पाची मनोभावे पूजा केली. सर्वच नेत्यांनी करोनाचे संकट दूर व्हावे, असे साकडेही गणरायाला घातले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच ट्वीट करून जनतेला उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 'करोना विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी. तसंच, या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो,' अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केली. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीही श्रीगणरायांच्या आशीर्वादानं संपूर्ण महाराष्ट्र लवकरच करोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.