प्रभू रामचंद्र की जय! कोल्हापूरचा रामभक्त २८ वर्षानंतर चप्पल घालणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 5, 2020

प्रभू रामचंद्र की जय! कोल्हापूरचा रामभक्त २८ वर्षानंतर चप्पल घालणार

https://ift.tt/2DchS8I
कोल्हापूर: जोपर्यंत राम मंदिराचा कलशारोहण समारंभ होणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असा पण करत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २८ वर्षे अनवाणी फिरणाऱ्या करवीर तालुक्यातील शिये येथील या रिक्षाचालकाची इच्छा आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातील हा रिक्षा चालक सहा डिसेंबर १९९२ रोजी अयोध्या येथे कारसेवक म्हणून उपस्थित होता. त्याच दिवशी त्याने जोपर्यंत राम मंदिराचा कलशारोहण समारंभ होत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याचे वय होते अवघे १७ वर्षे. त्या दिवसापासून त्याने ऊन, वारा,पाऊस काहीही असले तरी एकदाही पायात चप्पल घातले नाही. शेती आणि रिक्षा व्यवसाय करत असताना चप्पल विना त्याला अनंत अडचणी आल्या. पण तरीही त्याने आपला निर्णय बदलला नाही. २००२ मध्ये अयोध्या येथे झालेल्या शिलान्यास कार्यक्रमासही तो उपस्थित होता. तब्बल २८ वर्षांनंतर अयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन समारंभ होत असताना त्याची इच्छा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आज त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण जोपर्यंत कलशारोहण समारंभ होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नसल्याचे त्यांनी सांगितले. राम मंदिराबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय, भूमिपूजन समारंभ आणि कलशारोहण समारंभ हे आपल्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचे क्षण असतील असे त्यांनी सांगितले.