तुम्हाला स्वत:वर करोना लशीची चाचणी करायची आहे?, 'या' आहेत अटी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 23, 2020

तुम्हाला स्वत:वर करोना लशीची चाचणी करायची आहे?, 'या' आहेत अटी

https://ift.tt/3lbg6FS
नवी दिल्ली: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) करोनावरील लशीच्या (corona vaccine) पहिल्या टप्प्यातील मानवी परीक्षणासाठी (human trial of corona vaccine) स्वयंसेवकाच्या शोधात आहे. या परीक्षणात सहभागी होण्यासाठी काही अटी आहेत. तुम्ही त्या अटी पूर्ण केल्यास तुमच्या इच्छेनुसार करोना लशीची चाचणी तुमच्यावर केली जाऊ शकते. आतापर्यंत या चाचणीत सहभागी होण्याची सुमारे १००० लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. आम्हाला १०० स्वयंसेवकांची गरज होती मात्र, आमच्याकडे सतत फोन येत राहिले. लोक व्हॉट्सअॅपच्या माध्यामातूनही चाचणीत सहभाग नोंदवण्यासाठी विनंती करत आहेत. या व्यतिरिक्त आम्हाला ईमेलद्वारे देखील शेकडो लोकांनी विनंती केली आहे, असे दिल्लीते कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांनी सांगितले. या आहेत अटी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिचर्सचे (ICMR) प्रवक्ता डॉ. रजनीकांत श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही निरोगी प्रौढ भारतीय काही अटींसह या लशीच्या चाचणीत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतो. या चाचणीत सहभागी होण्यासाठी व्यक्तीचे वय १८ वर्षे ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे. या व्यतिरिक्त त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार असता कामा नयेत. तो पूर्णपणे निरोगी असला पाहिजे. या चाचणीत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला एखादी दुखापत झाल्यास किंवा काही रिअॅक्शन झाल्यास त्या परिस्थितीत नुकसान भरपाई वगळता पैसे दिले जात नाहीत. स्वयंसेवकाची घेतली जाते ब्लड टेस्ट स्वयंसेवकाचा एक स्वॅब नमुना रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलीमरेज चेन रिअॅक्शनसाठी (RRT-PCR) घेतला जातो. याद्वारे स्वयंसेवकाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग आहे किंवा नाही हे पाहिले जाते. आम्हाला असे स्वयंसेवक हवे असतात त्यांना वर्तमानात आणि भूतकाळात देखील संसर्ग झालेला नसावा, असे डॉ. राय म्हणाले. याद्वारे अँटीबॉडी आणि आरोग्याशी संबंधित इतर तपासण्यांसाठी ही रक्त चाचणी करण्यात येते. क्ल्कि करा आणि वाचा- अशी होते स्वयंसेवकांची निवड एम्सचे डॉ. राय यांनी माहिती देताना सांगितले की, या चाचणीत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यासाठी एक व्यवस्था तयार करण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या अर्जांवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जात आहे. मापदंड पूर्ण करणाऱ्या पहिल्या १० अर्जदारांना चाचणीसाठी निवडले जात आहे. सर्वसाधारणपणे २५ ते ३० टक्के अर्ज बफरच्या रुपात वेगळे ठेवले जातात. एकदा का बेसिक स्क्रीनिंग झाले की मग अर्जदारांना चाचणीसाठी सादर व्हावे लागते. सर्वप्रथम त्यांची कोविड-१९ची तपासणी केली जाते. क्लिक करा आणि पाहा क्लिक करा आणि वाचा-