नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात; चौघे जागीच ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 28, 2020

नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात; चौघे जागीच ठार

https://ift.tt/2Qu5jbN
म.टा. वृत्तसेवा। जुन्नर नगर-कल्याण महामार्गावर छोटा टेम्पो आणि आयशर ट्रकच्या भीषण धडकेत चार जण ठार झाले. पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहीती पोलिस ठाण्याचे निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, दांगट मळ्याजवळ आज पहाटे टाटा कंपनीच्या छोटा टेम्पो जितो (एम. एच. १६ सीसी ६३८८)मुंबईकडून आळेफाटा बाजूस येत होता, तर आयशर टेम्पो एम. एच. १६ ए. ई. ९०८० आळेफाटा बाजूकडून कल्याण दिशेने चालला होता. या अपघातात जितो टेम्पोतील आकाश रोकडे (रा. सुरकूल, ता. पारनेर, जिल्हा नगर) याच्यासह तिघे ठार झाले. हे चौघेही भाजीपाला विक्री करून गावी चालले होते. बाकी तिघांची ओळख पटली नसून नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे असे मुजावर यांनी सांगितले. सर्व मृत ३० ते ४० वयोगटातील आहेत. अपघातात आयशरचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती. आळेफाटा पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. वाचा: