गुड न्यूज- अनुष्का- विराट होणार आई- बाबा, शेअर केला फोटो - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 27, 2020

गुड न्यूज- अनुष्का- विराट होणार आई- बाबा, शेअर केला फोटो

https://ift.tt/3lkDl0d
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अनुष्काने सोशल मीडियावर पती विराट कोहलीसोबत एक फोटो शेअर केला. यात ती गरोदर असल्याचं स्पष्ट दिसतं. तसंच जानेवारी २०२१ मध्ये आम्ही दोघांचे तीन होऊ असं कॅप्शनही तिने या फोटोला दिलं आहे. अगदी काही मिनिटांपूर्वी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये अनुष्काने पोलका डॉट असलेला काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे तर विराटने पांढरी पॅन्ट आणि करड्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. फोटोमध्ये दोघं फार आनंदी दिसत आहेत. बेबी बंप फ्लॉन्ट करताना अनुष्काच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे. अनुष्का आणि विराट दोघंही पहिल्यांदा २०१३ मध्ये एकमेकांना भेटले होते. तेव्हा एका जाहिरातीत त्यांनी एकत्र काम केलं होतं. यावेळी दोघांची चांगली मैत्री झाली आणि दोघं एकमेकांसोबत चांगला वेळ काढू लागले. लवकरच ते एकमेकांना डेटही करू लागले होते. जानेवारी २०१४ मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून भारतात परत आली तेव्हा तिथे विराटसोबत अनुष्काही होती. तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी इटलीमध्ये राजेशाही थाटात लग्न केलं. सध्या विराट आयपीएलसाठी यूएईला गेला आहे. करोनामुळे तो जवळपास पाच महिने घरी होता. दोघांनी एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ या काळात शेअर केले. या लॉकडाउनच्या काळात अनुष्का आणि विराटने एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवला. या लॉकडाउनच्या काळात विराट पूर्णपणे आयसोलेशनमध्ये होता. युएईला जातानाही त्याने टीमसोबत न जाता स्वतःच्या खासगी विमानाने युएईला जाणं सोईस्कर मानलं.