नवी दिल्ली : काँग्रेस महासचिव () यांनी आपल्या भावाचं समर्थन केलंय. काँग्रेसचे माजी अध्यक्ष () यांनी पदासाठी गांधी कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तीला नियुक्त करण्यात यायला हवं, असं म्हटलं होतं. प्रियांका यांनी याच गोष्टीचं समर्थन करताना 'कदाचित राजीनामा पत्रात नाही पण कुठे तरी राहुल गांधी यांनी आमच्यापैंकी कुणीही पक्षाचा अध्यक्ष असायला नको असं म्हटलं होतं आणि मी त्यांच्या म्हणण्याशी पूर्णत: सहमत आहे. मला वाटतं की पक्षाला आपला मार्ग शोधायलाच हवा'. 'इंडिया टुमारो' पुस्तकात दावा हा दावा 'इंडिया टुमारो' नावाच्या एका नव्या पुस्तकात करण्यात आलाय. या पुस्तकाचे लेखक आहेत प्रदीप चिब्बर आणि हर्ष शाह... हे पुस्तक १३ ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आलंय. पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे प्रियांका गांधी यांनी म्हटलंय 'एका पक्षाचा अध्यक्ष जरी गांधी कुटुंबातून नसेल तरीदेखील तो आपला बॉस असेल. जर पक्षानं मला उद्या सांगितलं की तुझी गरज उत्तर प्रदेशमध्ये ननाही तर अंदमान आणि निकोबार मध्ये आहे तर मी आनंदानं अंदमान आणि निकोबारला जाईल'. वाचा : वाचा : वाचा : पक्षांतर्गत निवडणुका होणार? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. सोबतच पक्षाच्या बैठकीत त्यांनी पक्षाचा पुढला अध्यक्ष गांधी घराण्यातून नसावा यावर त्यांनी जोर दिला होता. परंतु, काँग्रेसमध्ये यावर कुठलाही तोडगा निघाला नाही आणि काही महिने हे पद रिक्त राहीलं. त्यानंतर () यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये पुन्हा एकदा या पदाची जबाबदारी स्वीकारली. गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक करण्याची मागणी काँग्रेसमध्ये होतेय. वाचा : वाचा : वाचा : 'भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपांचा परिणाम मुलांवरही'२०१३ साली भाजपनं प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्याची सुरुवात केली होती. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, अंमलबजावणी संचलनालयात पतीची होणाऱ्या चौकशीमुळे आणि टीव्हीवर सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चेचा परिणाम मुलांवरही पडू लागला होता. त्यामुळे आरोप लागले तेव्हा त्या सर्वात प्रथम आपला मुलगा रेहानजवळ गेल्या आणि त्याला आपले देण्या-घेण्याची सगळी कागदपत्रं दाखवली. त्यावेळी तो केवळ १३ वर्षांचा होता.