भारतीय क्रिकेटपटू झाला विवाहबद्ध; त्रिशक झळकावण्याचा केलाय विक्रम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 8, 2020

भारतीय क्रिकेटपटू झाला विवाहबद्ध; त्रिशक झळकावण्याचा केलाय विक्रम

https://ift.tt/31w8eWj
विशाखापट्टणम: आंध्र प्रदेश क्रिकेट संघातील विकेटकिपर याने पाच ऑगस्ट रोजी आयुष्याची नवी सुरुवात केली. भरतने अंजली नावाच्या मुलीशी बुधवारी विवाह केला. विशाखापट्टणम येथे एका साध्या कार्यक्रमात हे दोघे विवाहबद्ध झाले. केएस भरत आंध्र प्रदेशमधील एक सर्वोत्तम क्रिकेटपटू मानला जातो. तो भारताच्या अ संघाकडून देखील खेळला आहे. भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एक सर्वोत्तम विकटकिपर म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. काही महिन्यांपूर्वी भारतीय संघात त्याची निवड झाली होती. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. वाचा- त्रिशतक करणारा पहिला खेळाडू २०१५ साली भरतने अशी कामगिरी केली होती जी भारतीय क्रिकेटमध्ये कोणालाच करता आली नाही. त्याने स्पर्धेत त्रिशतक झळकावले. रणजीत त्रिशतक करणारा तो पहिला विकेटकिपर ठरला आहे. त्याने ३११ चेंडूत ३०८ धावांची खेळी केली होती. त्यात ३८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. वाचा- आयपीएलमध्ये २०१६ साली तो दिल्ली कॅपिटल्स कडून खेळला. नोव्हेंबर २०१९ साली बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत वृद्धीमान साहाला बदली म्हणून भरतचा समावेश संघात करण्यात आला होता. तर जानेवारी २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत तो भारतीय संघात होता. पण अखेरच्या ११ खेळाडूंमध्ये त्याची निवड झाील नाही. वाचा- केएस भरतने ६९ प्रथम श्रेणी सामन्यात ३७.५८च्या सरासरीने ३ हजार ९०९ धावा केल्या असून त्यात ८ शतक आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. या शिवाय लिस्ट एच्या ३७ टी-२० सामने तो खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने ४०० विकेट घेतल्या आहेत. करोना व्हायरसमुळे विशाखापट्टणम येथील ग्रीन पार्क हॉटलमध्ये काही मोजक्या लोकांसह त्याने भरत आणि अंजली यांचा विवाह सोहळा पार पडला.