जोधपूरमध्ये एकाच कुटुंबातील ११ पाकिस्तानी शरणार्थींचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 9, 2020

जोधपूरमध्ये एकाच कुटुंबातील ११ पाकिस्तानी शरणार्थींचा मृत्यू

https://ift.tt/3ioVDeA
: राजस्थानच्या जोधपूरमध्ये ११ सापडले आहेत. मृत्युमुखी पडलेले सर्व जण आहेत. अद्याप त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. प्राथमिकदृष्ट्या विषारी वायूमुळे हे मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. देचू पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडल्याचं समजतंय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतले. मृत्यू झालेले सर्व पाकिस्तानातून विस्थापित होऊन भारतात दाखल झाले होते. हे सर्व अचलावता नावाच्या गावात शेतीचं काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा पोलीस शोध घेत आहेत. मृतांमध्ये ७ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. वाचा : वाचा : घटना घडली त्यावेळी या कुटुंबातील एक बहिण रक्षाबंधनाच्या निमित्तानं भावाला राखी बांधण्यासाठी उपस्थित झाली होती. त्यामुळे घरात एकूण १२ सदस्य होते. त्यातील एक सदस्य रात्री झोपण्यासाठी शेतात गेला होता. सकाळी येऊन पाहिलं तेव्हा त्याला संपूर्ण कुटुंबच मृत्यूच्या कुशीत झोपलेलं आढळलं. या भागात ११ मृतदेह एकाच वेळी सापडल्यानं मोठी खळबळ उडालीय. मृतांमध्ये ६ वयस्कर व्यक्तींसह पाच मुलांचा समावेश आहे. वाचा : वाचा :