काँग्रेस अध्यक्ष सोनियांची बैठक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार गैरहजर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 26, 2020

काँग्रेस अध्यक्ष सोनियांची बैठक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार गैरहजर

https://ift.tt/3ljz5y5
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष यांच्याकडून बुधवारी राज्यांच्या जीएसटीतील वाटा, देशभरात जेईई एनईईटी परीक्षा स्थगित करण्यासहीत अनेक मुद्यांवर एक डिजिटल बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी मंगळवारी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. ठाकरेंशिवाय यांच्यासहीत इतर मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील. बुधवारी दुपारी २.३० वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आपण या बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचं कळवलंय. काँग्रेसकडून अनेकदा आग्रह करण्यात आल्यानंतरही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे एका वेगळ्या चर्चेला आणि नव्या वादाला तोंड फुटलंय. वाचा : वाचा : वाचा : उद्या गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी ''ची एक बैठक होणार आहे. यापूर्वी काँग्रेसच्या बैठकीत सामूहिकरित्या भूमिका घेण्यासाठी काँग्रेसशासित चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसहीत उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी आणि तीन काँग्रेसेतर मुख्यमंत्र्यांनाही संपर्क करण्यात आला. या बैठकीत जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटीशी निगडीत राज्यांच्या पैशांची थकबाकी वेळेवर देण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी रणनीती तयार करण्याचा संकल्प आहे. सोबतच काँग्रेसच्या या बैठकीत देशभरातील जेईई-एनईईटी परीक्षा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी या अगोदरपासून या प्रश्नावर सक्रीय आहेत. तसंच सोमवारी नेते राहुल गांधी यांनी 'आज लाखो विद्यार्थी सरकारला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. एनईईटी, जेईई परीक्षेसंदर्भात त्यांचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे आणि सरकारनं त्यावर सार्थ तोडगाही काढायला हवा' असं म्हणत हा मुद्दा उचलून धरला होता. वाचा : वाचा :