कोविड केअर सेंटरला भीषण आग, ७ जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 9, 2020

कोविड केअर सेंटरला भीषण आग, ७ जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू

https://ift.tt/3ab6PZ7
विजयवाडा: आंध्र प्रदेशातील येथील एका कोविड केअरल सेंटरला लागलेल्या भीषण आगीत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या सेंटरमध्ये एकूण ४० जण असून त्यांमध्ये ३० रुग्णांचा आणि १० केअर सेंटरच्या स्टाफचा समावेश आहे. खरे तर हे एक हॉटेल असून सध्या त्याचे रुपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून, ३० जणांना वाचवण्यात यश आल्याचे विजयवाडा पोलिसांनी माहिती देताना सांगितले. या आगीवर मोठ्या प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तसेच आगीत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. आगीत जखमी झालेल्यांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. सध्या ही संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून, घटनास्थळी पोलिसदल तैनात करण्यात आले आहे.