मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणाचा तपास सीबीआयला दिल्यामुळे शिवसेना आणि भाजपात रणकंदन सुरू झालेलं असतानाच शिवसेनेचे खासदार यांनी या प्रकरणावरून मोठं विधान केलं आहे. सुशांतचं प्रकरण सीबीआयकडे देता तर मग आणि भाजप नेते यांच्या मृत्यूचीही सीबीआय मार्फत चौकशी करा, असं आव्हानच अरविंद सावंत यांनी भाजपला दिलं आहे. सीबीआय चौकशी अशी ऊठसूठ उठून करता येत नसते. कुणी मागणी केली म्हणजे चौकशी केलीच पाहिजे असे नाही. राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस केली पाहिजे. सीबीआय चौकशी लावण्याची काही प्रक्रिया आहे. लोकशाहीचे काही संकेत आणि नियम आहेत. त्यामुळे नियम डावलून कुणीही चौकशी करू शकत नाही, असं सांगतानाच तसंच जर करायचं असेल तर मग भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि जस्टिस लोया यांच्याही मृत्यू प्रकरणाची चौकशी लावा. येऊ द्या सत्य बाहेर, असं अरविंद सावंत म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील चर्चे दरम्यान त्यांनी ही मागणी केली. वाचाः उद्या कुणीही उठेल आणि विकास दुबे प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करेल. कोकणात एवढे लोक मेले. अजून त्यांचा थांगपत्ता नाही, मग सीबीआय चौकशी करणार आहात का? कुणीही उठावं आणि सीबीआय चौकशी लावावी याला काही अर्थ आहे की नाही? देशाच्या संविधानालाच आता धक्का देणार आहात का? असा सवाल करतानाच सुशांत प्रकरणाशी बिहार पोलिसांचा काय संबंध असा सवालही त्यांनी केला. मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत प्रकरणात योग्यरितीनं निष्पक्ष तपास करत आहेत. त्यामुळे बिहार सरकारच्या सांगण्यावरून याप्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल करण्याची किंवा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची गरज नाही. हा मुंबई पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काही लोक सुशांत प्रकरणाला विनाकारण राजकीय रंग देत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, सुशांतसिंह प्रकरणात शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जात आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला जाहीर आव्हानच दिलं आहे. हिंमत असेल तर पर्यटन मंत्री यांचं नाव घेऊन आरोप करा, असं खुलं आव्हानच नेते यांनी भाजपला दिलं आहे. वाचाः