न्यूयॉर्क: महाग स्मार्टफोनसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयफोनची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे बाजार भांडवल दोन ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. हा मैलाचा दगड पार करणारी अॅपल ही अमेरिकेतील पहिली कंपनी ठरली आहे. याआधी दोन वर्षापूर्वी अॅपलने १ ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपचा टप्पा गाठला होता. वाचा- नॅसडॅकमध्ये बुधवारी सकाळी बाजार सुरू होताच अॅपलचे शेअर ४६७.७७ डॉलरवर पोहोचले त्याचबरोबर कंपनचे मार्केट कॅप २ ट्रिलियनवर गेले. आयफोन, आयपॅड निर्मिती करणाऱ्या ही कंपनी १२ डिसेंबर १९८० रोजी पब्लिक लिस्टेड झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर ७६ हजार टक्क्यांनी वाढलेत. वाचा- अॅपलची स्थापना स्टीव जॉब्स यांनी १९७६ साली पर्सनल कम्प्युटर्स विक्रीसाठी केली होती. आता या कंपनीने २ ट्रिलियन डॉलरचे मार्केट कॅप गाठले आहे. ही रक्कम अमेरिकेत गेल्या वर्षी जमा झालेल्या एकूण कर उत्पन्नापेक्षा थोडी अधिक आहे. अमेरिकेतील युएस स्टीलने १९०१ मध्ये १ बिलियन डॉलर मार्केट कॅप हा टप्पा गाठला होता. वाचा- जगभरातील कंपन्यांचा विचार केल्यास अॅपलच्या आधी २ ट्रिलियन मार्केट कॅपचा टप्पा गाठणारी पहिली कंपनी साउदी अरामको होती. गेल्या वर्षी अरामकोने हा टप्पा गाठला होता. जुलै तिमाहीत अॅपलचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी येत आहे. २०२० मध्ये आतापर्यंत कंपनीचे मुल्य ५७ टक्क्यांनी वाढले आहे.