संजय राऊतांना नेमकं काय म्हणायचंय? 'या' ट्वीटची तुफान चर्चा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 20, 2020

संजय राऊतांना नेमकं काय म्हणायचंय? 'या' ट्वीटची तुफान चर्चा

https://ift.tt/31hXoEN
मुंबई: अभिनेता प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवल्यानंतर ठाकरे सरकार विरोधकांच्या रडारवर आहे. खासदार हे देखील टीकेचे धनी ठरले आहेत. न्यायालयाच्या निकालावर बोलताना राऊत यांनी काल सावध भूमिका घेतली होती. मात्र, आज त्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळं चर्चेला उधाण आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काल संजय राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलले. मात्र, न्यायालयाच्या निर्णयावर राज्याचे अॅडव्होकेट जनरल व मुंबई पोलीस आयुक्त हेच सविस्तर बोलू शकतील, असं त्यांनी म्हटलं होतं. खरंतर, संजय राऊत हे अधूनमधून आपल्या ट्विटर अकाऊंटवर विविध प्रकरणांवर सूचक भाष्य करणारे 'शेर' किंवा कवितेच्या ओळी टाकत असतात. त्यामुळंच सुशांतसिंह प्रकरणाचा निकाल आल्यानंतर ते काय ट्वीट करतात याकडं लक्ष लागलं होतं. मात्र, त्यांनी त्याबद्दल काहीही ट्वीट केलं नव्हतं. त्यामुळं ट्रोलर्सकडून त्यांची खिल्ली उडवली जात होती. ही टीकाटिप्पणी सुरू असतानाच आज राऊत यांनी 'संजय उवाच' असं म्हणत एक 'शेर' ट्वीट केला आहे. 'उनसे कहना की... किस्मत पे इतना नाज ना करे... हमने बारिशों मे भी जलते हुए मकान देखे है..." असं त्यांनी म्हटलं आहे. या शायरीच्या नंतर त्यांनी 'जय महाराष्ट्र' असंही लिहिलं आहे. शायरीतून त्यांनी नेमका कोणाला टोला हाणला आहे आणि शायरीच्या शेवटी 'जय महाराष्ट्र' लिहिण्याचा त्यांचा उद्देश काय, याची चर्चा आता सुरू झाली आहे. वाचा: वाचा: