१२ ऑगस्टला वंचितचे लॉकडाऊनविरोधात 'डफली बजाव' आंदोलन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 10, 2020

१२ ऑगस्टला वंचितचे लॉकडाऊनविरोधात 'डफली बजाव' आंदोलन

https://ift.tt/3iom2Jf
पुणे: विरोधात आता अत्यंत आक्रमक झाली असून लॉकडाऊनचा निषेध म्हणून वंचितकडून येत्या १२ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. वंचितकडून डफली वाजवून सरकारला जाग आणण्याचं काम करण्यात येणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सांगितले. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी घोषणा आंबेडकर यांनी केली आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार इ. संघटनांना भेटून या आंदोलनात सामील होण्याची विनंती करावी, असेही आवाहन त्यांनी केलंय. या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व सांगावे शिवाय लॉकडाऊनला विरोध का आहे?, हेही समजावून सांगावे, असेही त्यांनी म्हटलं आहे.