नवी : दिल्लीतील परिसरात एका १३ वर्षीय केल्याची घटना घडली आहे. मुलगी फ्लॅटमध्ये एकटीच होती. त्यावेळी तिच्यावर बलात्कार केला. मुलीने प्रतिकार केला असता, तिला कैचीने भोसकले. गंभीर जखमी अवस्थेत मुलगी सरकत शेजारील फ्लॅटपर्यंत पोहोचली. दरवाजा ठोठावून तिनं शेजाऱ्यांना बोलावून घेतलं. त्यांना सर्व हकिकत सांगतानाच ती बेशुद्ध पडली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पश्चिम विहार (वेस्ट) पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ मुलीला संजय गांधी रुग्णालयात दाखल केले. तिच्या शरीरावर जखमा होत्या. धारदार शस्त्राने तिच्यावर वार केल्याचे दिसत होते. रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला एम्स रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि पॉक्सो अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. मुलीने नोंदवलेल्या जबाबानुसार दोन मुले होती. दोघेही संशयित आजूबाजूच्या परिसरातीलच असतील असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १३ वर्षीय पीडित मुलगी कुटुंबीयांसह पीरागढी येथे भाड्याने राहतात. कुटुंब मूळचे बिहारचे आहे. ते ज्या फ्लॅटमध्ये राहतात ती इमारत तीन मजल्यांची असून, त्यात २५ फ्लॅट आहेत. परिसरातील कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार त्या ठिकाणी राहतात. तिची मोठी बहीणही नोकरी करते. पीडित मुलगी ही घरात एकटीच असते. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती. प्राथमिक चौकशीत दोन आरोपींनी हे क्रूर कृत्य केल्याचा अंदाज आहे. मुलीवर बलात्कार केला. प्रतिकार केला असता, तिच्या हत्येचा प्रयत्न केला गेला. तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. शरीरावर गंभीर जखमा होत्या. एम्समध्ये मुलीवर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे आता सांगण्यात येत आहे. शेजारच्यांनी तिच्या आईवडिलांना घटनेची माहिती दिली. वैद्यकीय तपासणीचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. इमारतीत राहणाऱ्या सर्व रहिवाशांची चौकशी करण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.