डॉक्टर म्हणाले, सुशांतच्या कुटुंबियांची अवस्था पाहवत नाही - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 14, 2020

डॉक्टर म्हणाले, सुशांतच्या कुटुंबियांची अवस्था पाहवत नाही

https://ift.tt/2XZUFh2
पटणा- सुशांतसिंह राजपूतची केस दिवसेंदिवस अधिक गुंतत चालली आहे. सुशांतच्या वडिलांनी यांनी रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणात अनेक खुलासे झाले आहे. टाइम्स नाऊने आता सुशांतच्या फॅमिली डॉक्टरांशी यासंबंधी चर्चा केली. यावेळी डॉक्टरांनी सुशांतचं संपूर्ण कुटुंब अतीव दुःखात असल्याचं सांगितलं. डॉक्टर म्हणाले सुशांतमध्ये नक्कीच बदल झाला असेल सुशांतचे कौटुंबिक मित्र डॉक्टर विपीन कौशल यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं की, सुशांतच्या कुटुंबावर या प्रकरणाचा मोठा परिणाम झाला आहे. सुशांत फार सकारात्मक होता. तो नेहमी आपलं कुटुंब आणि भविष्याबद्दल बोलायचा. या काळात काही गोष्टी बदलल्या असतील. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी असं मलाही वाटतं. त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. सुशांत असं करू शकत नाही डॉक्टर कौशल म्हणाले की, याक्षणी सुशांतच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. मी सुशांतच्या वडिलांना ओळखतो. आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक आहेत. बहिणी असो किंवा त्यांचे पती सर्वांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. सुशांतचे भविष्याबद्दल अनेक स्वप्न होती. तो आत्महत्या करू शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा विचार केल्यावर मनात प्रश्न उपस्थित होतात. दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या केसच चौकशी आता सेन्ट्रल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन ( ) करत आहे. सुशांतचे वडील आणि त्याच्या बहिणीने सुशांतच्या बॉलिवूडमधील संबंधांवर चर्चा केली. फरीदाबाद येथे सुशांतच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले. रिपोर्टनुसार, चौकशी दरम्यान सुशांतच्या वडिलांनी सुशांतची हत्या झाल्याचे सांगितले.