करोना साथीच्या सावटाखाली यंदाच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे. या निमित्तानं जाणून घेऊनया राज्यभरातील उत्सवाची वैशिष्ट्ये व ठळक घडामोडी... लाइव्ह अपडेट्स: करोना विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गणरायाकडे प्रार्थना; जनतेला दिल्या शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ''चा आरोग्यउत्सव; रक्तदान शिबीर सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधीच गणरायाच्या मूर्ती आणल्यानं अनेक घरात गणरायाची सकाळीच प्रतिष्ठापना मुंबईतील 'लालबागचा राजा'च्या मंडपात रक्तदान शिबिराला सुरुवात. 'राजा'च्या अनेक भक्तांची उपस्थिती पुण्यातील मानाच्या कसब गणपती मंडळानं यावर्षी दिला सजावटीला फाटा पुण्यातील अनेक सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीची केली गणेशाची प्रतिष्ठापना वाचा: सकाळपासूनच गणरायाच्या प्रतिष्ठापनेची लगबग. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी गणरायाचे आगमन चैतन्याचा महाउत्सव असलेल्या गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात