नवी दिल्ली : राजनाथ सिंह आज सकाळी १०.०० वाजता एक महत्त्वपूर्ण घोषणा करणार आहेत. यासंबंधात संरक्षण मंत्रालयाकडून रविवारी सकाळी सोशल मीडियावर ट्विट करून माहिती देण्यात आलीय. लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर (Actual line of control) चीनसोबत तणावाचं वातावरण असताना संरक्षण मंत्री काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचच लक्ष लागलंय. (अपडेट बातमी वाचण्यासाठी पेज रिफ्रेश करा) मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री आज सकाळी १०.०० वाजता एक महत्त्वपूर्व घोषणा करतील. संरक्षण मंत्रालयाकडून लवकरच एक '' काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. यानुसार, काही हत्यारांच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे. देशातील उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतंय. वाचा : वाचा : वाचा : वाचा :