पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांकडे मागितलं वाढदिवसाचं 'गिफ्ट' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 18, 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांकडे मागितलं वाढदिवसाचं 'गिफ्ट'

https://ift.tt/3kqPr6M
नवी दिल्ली : भारताचे यांचा काल (गुरुवारी) १७ सप्टेंबर रोजी ७० वा होता. या दरम्यान, पंतप्रधानांना देश विदेशातून अनेक नेत्यांनी आणि मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावरही नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा ट्रेन्ड दिसून आला. या दरम्यान अनेकांनी नरेंद्र मोदींना '' म्हणून काय हवंय? असा प्रश्नही विचारला. देशवासियांच्या या प्रेमळ प्रश्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिसाद देत देशवासियांकडे आपल्यासाठी 'वाढदिवसाचं गिफ्ट' मागितलंय. गुरुवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर पंतप्रधानांनी आपली इच्छा जाहीर केली. 'मला आपल्या वाढदिवसानिमित्त काय हवंय, असं अनेक लोकांनी मला विचारलं. तर मला या गोष्टी हव्यात...' असं ट्विटमध्ये म्हणत नरेंद्र मोदींनी आपली 'विश लिस्ट' सांगून टाकली. या विश लिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांना आपापली काळी घेण्याचा तसेच सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला. वाचा : वाचा : पंतप्रधानांची 'विश लिस्ट' - मास्कचा वपर करा आणि मास्क योग्यरितीनं वापरा - सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा. 'दोन गज की दूरी' लक्षात ठेवा - गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा - आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याचा प्रयत्न करा - चला, आपलं वातावरण निरोगी करुया असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. सोबतच, पंतप्रधानांनी वाढदिवसा निमित्तानं शुभेच्छा देणाऱ्या देश-विदेशातल्या लोकांचे आभार मानलेत. ' संपूर्ण देशानं आणि जगातील लोकांनी मला शुभेच्छा दिल्या, मी त्या सर्वांचाच आभारी आहे. या शुभकामनाच मला देशवासियांची सेवा करण्याचा आणि त्यांचं आयुष्य सुधारण्याच्या दिशेनं काम करण्याची शक्ती देतात' असंही पंतप्रधानांनी म्हटलंय. वाचा : वाचा :