सणासुदीचा दिलासा? आणखी १०० रेल्वे रुळावर येण्याची शक्यता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 1, 2020

सणासुदीचा दिलासा? आणखी १०० रेल्वे रुळावर येण्याची शक्यता

https://ift.tt/34P5vun
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून लवकरच आणखी १०० रेल्वे चालवण्यात येण्याची घोषणा होऊ शकते. सणावाराची तयारी म्हणून रेल्वेकडूनही नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी काही रेल्वे रुळावर येऊ शकतात. सध्या रेल्वेकडून केवळ २३० चालवल्या जात आहेत. यात ३० राजधानीचा समावेश आहे. या सर्व '' म्हणून चालवण्यात येत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर वाढवल्या जाणाऱ्या १०० रेल्वेही स्पेशल पद्धतीनंच चालवण्यात येतील. या रेल्वे राज्यांतर्गत आणि आंतरराज्यही असतील. सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालयाला यासाठी गृह मंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे. येत्या दोन महिन्यांत किंवा एप्रिल महिन्यात रेल्वेकडून जारी करण्यात येणाऱ्या झिरो-बेस्ड टाईमटेबलमध्ये या रेल्वेच्या वेळांत कोणताही बदल केला जाणार नाही. रेल्वे मंत्रालयानं टप्प्याटप्यात परिस्थिती रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं म्हटलंय. या अगोदर अनेकदा प्रवाशांच्या मागणीमुळे रेल्वे चालवण्याचा प्लान होता. परंतु, करोनाची परिस्थिती पाहता हा प्लान वारंवार पुढे ढकलण्यात आला. संबंधित बातमी : वाचा : वाचा : 'अनलॉक ४' अंतर्गत केंद्र सरकारनं सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून मेट्रो रेल्वे सुरू करण्याची परवानगी दिलीय त्यामुळे कर्मचारी वर्गाचा प्रवास मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातच सणांचेही दिवस आहेत त्यामुळे रेल्वेची मागणी वाढू शकते. रेल्वे अधिकाऱ्यांकडून जेईई-एनईईटीच्या विद्यार्थ्यांनाही दिलासा देण्यात आलाय. मुंबई आणि उपनगराचे विद्यार्थी केवळ आपलं परीक्षेचं अॅडमिट कार्ड दाखवून या रेल्वेतून प्रवास करू शकतील. सध्या या रेल्वेमध्ये आवश्यक सेवांत काम करणाऱ्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो. इतर बातम्या : वाचा : वाचा :