करोना संक्रमण : ८६ हजार दाखल, ११४१ जणांचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 25, 2020

करोना संक्रमण : ८६ हजार दाखल, ११४१ जणांचा मृत्यू

https://ift.tt/3416J3R
नवी दिल्ली : देशात करोना संक्रमणाचा आलेख तेजीनं वर चढताना दिसून येतोय. आरोग्य मंत्रालयाकडून शुक्रवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे ८६ हजार ०५२ नवीन रुग्ण दाखल करण्यात आलेत. याचसोबत एकूण ५८ लाख १८ हजार ५७० वर पोहचलीय. गेल्या २४ तासांत म्हणजेच एका दिवसात करोनामुळे ११४१ रुग्णांचा झालाय. आत्तापर्यंत देशात करोनामुळे एकूण ९२ हजार २९० जणांनी आपले प्राण गमावलेत. सप्टेंबर महिन्याची आकडेवारी केवळ सप्टेंबर महिन्यात आत्तापर्यंत २१ लाख ९७ हजार ३२५ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. तर १९ लाख ८१ हजार ३६३ रुग्ण आजारातून बरे झाले. मात्र एका महिन्यात २७ हजार ८२१ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. वाचा : वाचा : दिलासादायक म्हणजे, एकूण रुग्णांच्या संख्येपैंकी जवळपास ४७ लाखांहून अधिक रुग्णांनी करोनावर मात केलीय. गेल्या २४ तासांत तब्बल ८१ लाख १७७ रुग्ण आजारातून बरे झालेत. एकूण ४७ लाख ५६ हजार १६४ रुग्णांनी करोनावर मात केलीय. देशात सध्या ९ लाख ७० ११६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात करोनाचा रिकव्हरी रेट ८१.७४ टक्क्यांवर आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांचा दर १६.६७ टक्के आणि मृत्यू दर १.५८ टक्के आहे. पॉझिटिव्हिटी रेट ५.७६ टक्के आहे. कोविड संक्रमणादरम्यान कोविड चाचण्यांवरही भर दिला जातोय. गेल्या २४ तासांत रेकॉर्डब्रेक १४ लाख ९२ हजार ४०९ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. उल्लेखनीय म्हणजे, देशात आत्तापर्यंत ६ कोटी ८९ लाख २८ हजार ४४० नमुन्यांची चाचणी पार पडलीय. वाचा : वाचा :