काय सांगता.. करोनाविरोधात डेंग्यू ठरतोय 'सुरक्षा कवच'! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 22, 2020

काय सांगता.. करोनाविरोधात डेंग्यू ठरतोय 'सुरक्षा कवच'!

https://ift.tt/3cngVXW
रिओ दि जनेरियो: संसर्गाशी दोन हात करत असलेल्या संपूर्ण जगासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ब्राझीलमध्ये झालेल्या एका संशोधनात डेंग्यू आणि करोना विषाणूमध्ये संबंध आढळून आला आहे. डेंग्यूच्या तापामुळे करोना आजारापासून बचाव होत असल्याचे समोर आले आहे. डेंग्यूमुळे रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत असून यामुळे करोनाच्या विषाणूंना अटकाव होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ड्यूक विद्यापीठाचे प्रा. मिगुइल निकोलेलिस यांनी 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेसोबत बोलताना २०१९ आणि २०२० या दोन वर्षातील डेंग्यूच्या तापासह करोना प्रसाराची तुलनात्मक आकडेवारी सादर केली. ज्या भागामध्ये डेंग्यूच्या आजाराची मोठी साथ आली होती. त्या ठिकाणी करोनाचा संसर्ग कमी प्रमाणात आढळला असून बाधितांची संख्याही कमी आहे. वाचा: वाचा: ब्राझीलमध्ये झालेल्या संशोधनानुसार, ही आकडेवारी डेंग्यू विषाणू अॅण्टीबॉडी आणि करोना विषाणूमध्ये एक संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. डेंग्यूच्या आजारासाठी देण्यात आलेली एक सुरक्षित लस, औषध हे करोनापासूनही काही प्रमाणात बचाव करू शकते, असा दावा करण्यात आला आहे. डेंग्यू आणि करोना विषाणूमधील असा संबंध फक्त ब्राझीलच नव्हे तर दक्षिण अमेरिकेतील काही भाग, आशिया आणि पॅसिफिक महासागरातील देशांमध्ये आढळून आला आहे. वाचा: प्रा. प्रा. मिगुइल निकोलेलिस यांनी सांगितले की, ही आकडेवारी खूपच महत्त्वपूर्ण आहे. ज्या व्यक्तींच्या रक्तात डेंग्यूच्या अॅण्टीबॉडी आहेत, त्या व्यक्तींच्या करोना अॅण्टीबॉडी चाचणी चुकीच्या पद्धतीने पॉझिटीव्ह येत आहे. त्यांना करोनाची बाधाही झाली नसताना त्या व्यक्ती पॉझिटीव्ह आढळत आहेत. या दोन्ही विषाणूंमध्ये काहीतरी संबंध असावा असेही त्यांनी म्हटले. प्रा. मिगुइल निकोलेलिस यांचे संशोधन लवकरत विज्ञानविषयक नियतकालिकेत प्रकाशित होणार आहे. वाचा: ब्राझीलमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असून ४५ लाखांवर आकडा पोहचला आहे. तर, मृतांती संख्या १ लाख ३७ हजार झाली आहे. भारतातही करोनाबाधितांची संख्या ५५ लाखांहून अधिक झाली आहे. तर, ८८ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधित आहेत. अमेरिकेत ७० लाखजणांना बाधा झाली असून दोन लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वाचा: दरम्यान, करोना संसर्गाच्या थैमानामुळे संपूर्ण जग हतबल झाले आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रशियाने सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करून दिल्याची घोषणा केल्यानंतर आता चीनने ही मोठी घोषणा केली आहे. नोव्हेंबरपासून सामान्य नागरिकांसाठी लस उपलब्ध करून देणार असल्याचे चीनने म्हटले आहे.