
अलीगढ: उत्तर प्रदेशातील अलीगढमधील अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात भयानक घटना घडली. येथील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर सलग तीन दिवस केला. बेशुद्धावस्थेत मुलीला गावाजवळील बेरिया बागेत फेकून आरोपी पसार झाले. घटनेनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धडक दिली. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पीडितेच्या तक्रारीनुसार, २० सप्टेंबर रोजी दुपारी ती काही कामासाठी गावाबाहेर जात होती. त्याचवेळी रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या गावातीलच दोन तरुणांनी तिला पकडले. तिला बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिला अनोळखी ठिकाणी घेऊन गेले. तिथे डांबून ठेवून तीन दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बुधवारी रात्री उशिरा बेशुद्धावस्थेत मुलीला गावाजवळील बेरियो बागेत फेकून आरोपी फरार झाले. या घटनेनंतर मुलीने आपबीती सांगितली. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.