वॉशिंग्टन: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील रशियाच्या भागात वायू गळती झाला असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर दुरुस्तीच्या कामासाठी स्थानक बंद करण्यात आले आहे. सध्या यावेळी स्थानकात एक अमेरिकन आणि दोन रशियन उपस्थित आहेत. या घटनेमुळे अंतराळवीरांच्या प्राणाला कोणताही धोका नसल्याचे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने स्पष्ट केले. मुख्य कार्य क्षेत्राला वेगळे केले सोमवारी रात्री उशिरा फ्लाइट कंट्रोलर्सने 'एक्सपीडिशन ६३' च्या चालक दलाला वायू गळती होत असल्याची माहिती दिली. तात्काळ त्यांनी तातडीने पावले उचलण्यास सांगितले. वायू गळती होणाऱ्या भागाचे छिद्र मोठे होत चालले होते. ग्राउंड अॅनालिस्ट्सने तातडीने या भागाला मुख्य कार्य क्षेत्रापासून वेगळे केले. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे नासाने म्हटले आहे. वाचा: काही दिवसांपासून वायू गळती मागील काही दिवसांपासून वायू गळती होत असल्याची माहिती नासाने दिली. त्यावेळी कोणताही धोका आढळून आला नव्हता. सध्याची परिस्थिती पाहता या अंतराळ स्थानकात असलेल्या अंतराळवीरांना कोणताही धोका नसल्याचे समोर आले आहे. हा वायू गळती Zvezda च्या वर्किंग मॉडेलमध्ये झाला आहे. वाचा: वाचा: डेटा जमा करण्याचे आदेश नासाचे अंतराळवीर आणि स्टेशन कमांडर क्रिस कॅसिडी, रशियन अंतराळवीर अनातोली आणि इविनेशिन इवान वॅगनर यांना वायू गळती झालेल्या ठिकाणाहून माहिती जमावण्याची सूचना देण्यात आली आहे. क्रू ने ही माहिती एकत्रित करण्यासाठी एक अल्ट्रासॉनिक लीक डिटेक्टरचा वापर केला होता. वाचा: दुरुस्तीचे काम सुरू या अंतराळ स्थानकात अमेरिकेच्या सेगमेंटमधील अमेरिकन, युरोपीयन आणि जपानी मॉड्युल्समधील गळतीची काही दिवसांपूर्वीच तपासणी करण्यात आली होती. तर, काही दिवसात याची दुरुस्ती करून त्या भागाला पुन्हा कार्यरत करण्यात येणार असल्याचे रशियाने म्हटले आहे.