६वी मुलगीच होणार असल्याचं पुजाऱ्याने सांगितले, पतीनं पत्नीवर केले कोयत्याने वार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 20, 2020

६वी मुलगीच होणार असल्याचं पुजाऱ्याने सांगितले, पतीनं पत्नीवर केले कोयत्याने वार

https://ift.tt/35QKL64
बरेली: उत्तर प्रदेशातील येथे एक भयंकर आणि लज्जास्पद घटना घडली आहे. सहावी मुलगी होणार असल्याचे पुजाऱ्याने सांगितल्यानंतर पतीने आपल्या चार महिन्यांच्या गर्भवती पत्नीवर कोयत्याने वार केले. यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक आहे. सिव्हिल लाइन्स परिसरात शनिवारी ही घटना घडली. महिलेला पाच मुली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पन्नालाल (वय ४३) हा मजूर आहे. शनिवारी तो घरी आला. त्यानंतर त्याने अनिता देवी (वय ४०) हिच्याशी वाद घातला. गर्भपात करण्यासाठी तो तिच्यावर दबाव आणत होता. मात्र, अनिता देवी यांनी त्यास नकार दिला. पन्नालाल याने कोयत्याने तिच्या पोटावर वार केले. आरडाओरड ऐकून शेजारी धावत आले. त्यांनी जखमी अवस्थेत अनिता यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. तिच्या छाती आणि पोटावर जखमा होत्या. जखमी खोलवर आहेत. धारदार शस्त्राने तिच्यावर वार करण्यात आल्याची शक्यता आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. महिलेचा भाऊ रवी कुमार याने सांगितले की, माझ्या बहिणीला पाच मुली झाल्यामुळे मेहुणा तिला मारहाण करायचा. माझ्या आईवडिलांनी त्यांचे वाद मिटवण्याचे अनेकदा प्रयत्न केले. मात्र, तो इतक्या टोकाचे पाऊल उचलेल याचा विचार कुणीही केला नसेल. आम्ही आरोपीला अटक केली असून, त्याची चौकशी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. आणखी बातम्या वाचा: