सूरत: गुजरातमधील येथे असलेल्या ओएनजीसीच्या (Oil and Natural Gas Corporation) प्लाण्टला भीषण आग लागली आहे. पहाटेच्या सुमारास प्लाण्टमध्ये मोठे स्फोटाचे आवाज झाले आणि त्यानंतर आगीचे लोळ उठले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. जीवितहानीचे कोणतेही वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.